कविता 

आता नको….!

कवी :-
प्रा. तानाजी सयाजी म्हेत्रे (सर)
(तालुकाध्यक्ष – शिक्षण भारती संगठना.)

=========================================================================

आता नको थाळ्या,टाळ्या; आता फक्त हव्यात ऑक्सिजनच्या नळ्या.|१|

आता नको काकस्पर्श की रक्ताच्या नात्याचा खांदा;आता झालाय फक्त प्रेतं जाळण्याचा वांदा.|२|

आता नको दहावा,बारावा की तेरावा; आता फक्त हवाय या वळणावर एक विसावा.|३|

आता नको भांडण मंदिर,मज्जिद की गुरुद्वार; संकटकाळात एकच प्रश्न,धर्म स्थळाचे बंद दार.|४|

आता नको जप,तप, बुवा,बाबा; फक्त हवाय वास्तविकतेला दूर ठेवणाऱ्या कर्मकांडावर ताबा.|५|

आता नको नेता,कार्यकर्ता कोणी बॉस कोणी खास; फक्त हवाय कर्तव्यातला विश्वास आणि जगण्यासाठी श्वास.|६|

आता नको वेगळा कोणी हिंदू, मुस्लिम, सिख ईसाइ; फक्त पाहिजे मानवतेच्या धर्माचा एकच भाई.|७|

आता नको माझा माझा राम,कृष्ण, रहीम ख्रिस्त; फक्त पाहिजे माणसासाठी माणुसकीची शिकस्त.|८|

(Editing – काव्यसंग्रह – मागे वळुन पाहताना.)

——————————

Related posts