Blog

राष्ट्रीय विज्ञान दिन – निरंतर विकास : बदलते विज्ञान-तंत्रज्ञान

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

===================================================================================================

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जागृती करण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न_________

आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस माझ्या सर्व विज्ञान शिक्षकांना व विज्ञानावर प्रेम करणाऱ्या सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञान युग आहे जशी देशाची लोकसंख्या, जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे या परिवर्तनशील परिस्थितीत आपला विद्यार्थी किंवा या बदलणाऱ्या शिक्षणाच्या बाजारात आपला नवीन विद्यार्थी टिकला पाहिजे आज तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरले आहे

तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे विज्ञान विषयाबद्दल तंत्रज्ञानाबद्दल शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवले जाते राज्यातील सर्व विद्यार्थी, तळागाळातल्या विद्यार्थ्याला विज्ञान म्हणजे काय? विज्ञान विषयांमध्ये काय केले जाते विज्ञान प्रॅक्टिकल केल्यानंतर काय होते काय फायदा मिळतो याचे ज्ञान व्हावे तसेच आपण केलेल्या प्रयोगाचा समाजाला लोकांना देशाला कसा फायदा आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात ही साधारणपणे सन 1975 पासून झाली यामध्ये विद्यार्थी तर सहभागी असतातच पण विद्यार्थ्यां समवेत विज्ञान शिक्षक सुद्धा आवडीने सहभागी होतात नवनवीन कल्पना त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून मांडतात शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन असते त्यात नव, उपक्रम नवीन संकल्पना विचारांची मांडणी केलेली असते वर्षानुवर्षे बदलल्या विचारांचा प्रवाह, समूह समोर येतो विज्ञान वादावर व तंत्रज्ञानावर विश्वास निर्माण व्हावा आपण केलेल्या प्रयोग सिद्ध व्हावा व आत्मविश्वास वाढावा, आपण केलेल्या उपक्रमाचा समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी उपयोग व्हावा हा प्रमुख उद्देश या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा असतो

विज्ञान श्वास आहे विज्ञान ध्यास आहे तंत्रज्ञान आम्हास हवे आहे असे म्हणत आजचा विद्यार्थी पुढे पुढे जात आहे विज्ञान जगात आलो की आठवण येते ती शहीद कल्पना चावला यांची! देशासाठी, संशोधनासाठी स्वतःला आत्मविश्वासाचे पंख लावून आकाशात झेप घेतलेली भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी कल्पनाशक्ती वापरून कल्पना चावलाने यशस्वी भरारी घेतली जिद्दी आणि जिज्ञासू कल्पनेने उत्तुंग आकाशात उत्तुंग भरारी घेतली हे भारताचे एक खूप मोठे यश होते पण दुर्दैवाने यांनासहित तिच्याही शरीराचे तुकडेतुकडे झाले देशासाठी प्राण अर्पण केले। आज राष्ट्रीय विज्ञान दिनी आठवण येते त्या महान वीरांगना कल्पना चावलाची त्यांच्या या महान कार्याला सलाम व विनम्र अभिवादन!

विज्ञानाची कास धरून विज्ञानच माझे जीवन आहे समजून देशासाठी कार्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा या क्षेत्रात सिंहाचा वाटा होता भारताच्या या तंत्रज्ञान क्षेत्रात विकासात निरंतर सहभाग व प्रयत्न होता विज्ञान जगात पुरुष, स्त्री असा कुठलाही भेदभाव नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी , राष्ट्रसंत गाडगे बाबा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी अज्ञान अंधश्रद्धेला बळी पडू नका विज्ञानाची कास धरा वैज्ञानिक दृष्टिकोण आपल्या डोळ्यासमोर ठेवावा व आपण स्वतः तसेच समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा संदेश दिला बदलणार्‍या काळासोबत जगासोबत जायचे असेल राहायचे असेल तर विज्ञानवादी बनवून विज्ञानाची कास धरून चालायला शिका जसे आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे देशाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे

आज आपण घरी बसल्या बसल्या जगातील पूर्ण माहिती आपल्या टीव्हीवर मोबाईलवर पाहू शकतो ध्वनीच्या वेगाने उडणाऱ्या विमानात बसून आनंदाने प्रवास करू शकतो कळणारही नाही की एका देशातून दुसर्‍या देशात कसे व केव्हा आलो कडक अशा उन्हाळ्यात आपण फ्रीज कूलर चा वापर करतो व आपले जीवन सुखी आनंदी बनवतो हे वी ज्ञानामुळेच! तसेच थंडीच्या काळात आपण गरम वातावरण करू शकतो व उबदारपणे थंडीपासून बचाव करू शकतो आल्हाददायक वातावरण करू शकतो तसेच सौर ऊर्जेचा वापर आपण करू शकतो सूर्य हा सर्वात मोठा ऊर्जेचा साठा आहे सूर्यापासून आपण विविध प्रकारचे ऊर्जेचे स्त्रोत निर्माण करू शकतो व आपल्या जीवनात त्याचा उपयोग करू शकतो जोपर्यंत जीवसृष्टी आहे, जिवंत आहे तोपर्यंत आपण सूर्याचा उपयोग करून घेऊ शकतो अशाप्रकारे आपण राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बाल विद्यार्थ्यांचे कल्पनाशक्तीला वाव देतो व त्यांचा विकास होतो

आधुनिक काळात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर होत आहे जलसिंचन व्यवस्था पिकांची लावणे पिकांची काढणी मळणी यंत्र ट्रॅक्टर च्या माध्यमाने आधुनिक शेती केली जाते ही विज्ञानाची किमया आहे आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांचे पूर्वीचे कष्ट खूप कमी झालेले आहेत नांगरणे कोळपणे पाणी देण्याची पद्धती बागायती शेती व शेतीचे व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात खूप मोठा फायदा होत आहे तसेच देशाच्या युद्धसामग्री क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञानाने खूप मोठी झेप घेतली आहे आधुनिक शस्त्रसाठा रणगाडे अत्याधुनिक लढाऊ विमाने ही सर्व आपल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचे व आपल्या संशोधकाचे यश आहे आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात तर अमुलाग्र बदल झाला आहे सर्वत्र डिजिटल शिक्षणाचे वारे वाहत आहे मोबाईल व इंटरनेट शिक्षण पद्धती पुढे आली त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर अद्ययावत ज्ञान पुढे मिळत आहे जॅकी तुम्हा आम्हाला लहानपणी मिळालेले नाही आपली पाटी-पेन्सिल म्हणजेच आपले आजचे लॅपटॉप व विद्यार्थ्यांचे टॅब आहेत आणि वार्याच्या वेगाने बदलते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे

आजचे विद्यार्थी आजचे विद्यार्थी भविष्यात खूप मोठे संशोधक बनणार आहेत कोणी कल्पना चावला, कोणी डॉक्टर जहांगीर भाभा, कोणी न्यूटन तर कुणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बनून देशाची सेवा करणार आहेत। आजच्या या कोरोनाच्या भयंकर अशा महामारी च्या काळात संघर्षाच्या काळात कोरूना वर मात करण्यासाठी निघालेली लस हे आपल्या विज्ञान संशोधकाचे फार मोठे यश आहे सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करावी आपण आपले कुटुम्ब सुरक्षित ठेवावे व कालानुरूप बदलावे हिच अपेक्षा।

पुनश्च एकदा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

Related posts