Blog

मातीत मिसळतो मातीचा देह—

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

—————///————//—–

माणसाच्या जीवनात दोन बाबी अत्यंत अविस्मरणीय आहेत त्या म्हणजे जन्म आणि मृत्यू !आश्चर्य हे आहे की या दोन्ही बाबी आपण स्वतः बघू शकत नाही या बाबींना वेळ नाही ,काळ नाही, ठावठिकाणा ही नाही, गाव नाही शिव नाही सगेसोयरे काहीही नाही या दोन बाबींना कदापिही रोखता येत नाही जन्म आणि मृत्यू या अटळ घटणाऱ्या घटना आहेत.

आपलं शरीर हे आपल्याला ईश्वराने दिलेलं अनमोल धन आहे, रत्न आहे, संपत्ती आहे, ती आपल्याला जतन करायची आहे सांभाळायची आहे आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे पृथ्वी वरील सर्व घटकांचा समावेश आपल्या शरीरात आहे पृथ्वीवरील ऊन वारा पाऊस पाणी पर्यावरण व पर्यावरणातील सर्व घटक पृथ्वीवरील माती जमीन ही महत्त्वाची आहे ज्याप्रमाणे कुंभार माती पासून चिखल व चिखला पासून विविध प्रकारचे विविध आकाराची मटकी बनवतो व मग ती बाजारात येतात आपण सर्व जण ती विकत घेतो व ती सर्वांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामी येतात” विठ्ठला तू वेडा कुंभार” अगदी तसेच ईश्वराने आपल्याला माणूस म्हणून बनविलेले आहे हा देह माती पासून तयार झालेला आहे व याचा शेवट मातीतच होणार आहे यालाच आपण जन्म आणि मृत्यू असे नाव देतो या निसर्गचक्राला कोणीही रोखू शकत नाही

या संसाराची गोडी काही अवीट आहे आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, संपत्ती आहे, चैन विलास आहे, पण वेळ संपली तर सगळं संपलं! देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात जोपर्यंत त्याची कृपादृष्टी आपणावर असेल त्याला काही होऊ शकत नाही किंबहुना काहीच होणार नाही ईश्वराने मानवी जन्म आपणाला दिला तो व्यर्थ घालवण्या करता नाही, आपल्या जीवनातील क्षण क्षण मोलाचा आहे आपणाला वाटून दिलेल्या या क्षणांमध्ये मौलिक कार्य करावयाचे आहे व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा त्याच वेळेचा सदुपयोग करून सत्कार्य करणे गरजेचे आहे आजच युग विज्ञान युग, कलियुग असलं म्हणजे काय झालं राम राम राहील, कृष्ण कृष्ण राहील ,राजा हरिश्चंद्र राहील, सती सावित्री राहील ,सिता पतिवृत्ता राहील! त्यांचे कार्य ते करतील पण कलियुगात त्या कामात एक दुसऱ्याला अडचण करतील या देहाबद्दल कितीही बोललं, कितीही लिहिलं, कितीही वाचलं, कितीही शोध संशोधन केलं, तितकं कमीच आहे बोलायला वेळ कमी पडतो, लिहायला शब्द कमी पडतात, आणि वाचायला डोळे सुद्धा कमी पडतात इतके मोठे स्वरूप या प्रक्रियांचे आहे

हे सर्व घडवून आणणारी एक मोठी निसर्ग शक्ती जगात कार्य करीत आहे, तिलाच आपण देवअसे म्हणतो” म्या बोलविल्या वेदु बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या थांबविल्या पृथ्वी थांबे ,”अशी अगाध कृपा त्या परमेश्वराची आहे अगाध लीला परमेश्वराची आहे म्हणून म्हटले जाते जन्म आणि मृत्यूच्या पुढे कुणाचच काही चालत नाही त्याच्या पुढे कोणालाच जाता येत नाही ना कुणाचा वशिला, ना डोनेशन, चालत नाही कोणाची चिट्टी, चपाटी चालत नाही माणसाच्या जीवनाची वेळ एकदा संपली की झाले त्यामुळे सर्व जीवजंतू या शक्ती पुढे नतमस्तक होतात! कारण त्याला काळ आणि वेळ ही एकदाच आलेली असते ज्यावेळी काळ आणि वेळ ठरवून माणसाकडे येते तेव्हा मात्र कुणाचाच विलाज चालत नाही आई वडील, आप्तेष्ट,इष्ट,मित्र आपणाला पाहतील गळी पडून रडतील दुःख व्यक्त करतील पण त्यापुढे त्याला येता येणार नाही !

हे निर्विवाद सत्य आहे म्हणून माणसाने सत्य वागले पाहिजे वेळेच्या वेळी ते ते कर्तव्य केले पाहिजे आणि आपल्या देहाला निर्माण करणाऱ्या शक्तीला वंदन करुंन कधीच न विसरलं पाहिजे जन्म आणि मृत्यू यामधील काळ म्हणजेच जीवन होय मग हा आपल्याला मिळालेला नरदेह आपण आपल्या चांगल्या कार्यासाठी वापरला पाहिजे सर्व जीवांमध्ये माणसाला विशिष्ट अशी बुद्धी प्रतिभा लाभलेली आहे व तो त्याचा वापर करून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो पशू-पक्षी प्राण्यांना फक्त खाणे झोपणे फिरणे एवढीच दिनचर्या असते त्यांना फक्त पोट भरले की संपले पण मानवाचे तसे नाही त्याला पोटा बरोबरच इतर बऱ्याच गोष्टीची आवश्यकता असते काळजी असते प्रामुख्याने आपल्या जीवनात तीन टप्पे दिसून येतात बालपण, तरुणपण, आणि वृद्धावस्था मानवाला तिन्ही टप्पे पार करून जावे लागते व जीवनाचा अथांग सागर पार करायचा असतो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला विविध प्रकारचे निरनिराळे अनुभव येत असतात व येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड द्यावे लागते संघर्ष करावा लागतो त्याचा सामना करावा लागतो ईश्वराने आपल्या जन्माच्या पूर्वीच आपली सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे! निसर्ग चक्रानुसार उन्हाळा, पावसाळा ,व हिवाळा या सर्व ऋतूंमध्ये आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे आपला जन्म झाला की मातृ देवीच्या रुपाने लगेच दुधाची व्यवस्था केलेली आहे! आपण भुकेने उपवासाने मरू नये व्याकुळ होऊन नये याची काळजी देवाने घेतलेली आहे अगोदरच व्यवस्था करून ठेवली आहे मग हळूहळू आपली वाढ होत राहते भूक वाढते तशी आपल्याला हळूहळू दातांची सोय करून दिलेली आहे आपण स्वावलंबी व्हावे व स्वतः अन्न ग्रहण करावे यासाठी दात दिलेले आहेत त्यानंतर हळूहळू आपल्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून सर्व इंद्रियांची व्यवस्था निर्मिती केली आहे

जीभ व त्यापासून वाचा निर्माण केली ती आपल्याला बोलता यावे म्हणून अशाप्रकारे जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जन्मताच आपल्याला सर्व इंद्रिय दिलेले आहेत हा सगळा निसर्गाचा चमत्कार व नवल नवलाई आहे निसर्ग म्हणजेच देव आणि या निसर्गाने आपल्याला सर्वकाही भरभरून दिले आहे त्याचा शोध घेणे व त्याचा चांगला उपयोग करणे हे कार्य आपल्याला करावयाचे आहे आपण या निसर्गाचाच या पर्यावरणाचा एक घटक आहोत या मातीपासूनच आपला देह निर्माण झाला व शेवटी मातीतच विलीन होणार आहे आज पर्यंत करोडो करोडो असंख्य ताऱ्याप्रमाणे जीव आले व पृथ्वीवरून नष्ट झाले देवाने सर्वांना जगण्याचा समान हक्क दिला जगण्याचे स्वातंत्र्य दिले कसे जगायचे ते आपण ठरवायचे आपल्या जीवनात जगताना आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडता आल्या पाहिजेत पार पाडल्या पाहिजेत मी कोण आहे? माझे कर्तव्य काय आहे? माझी जबाबदारी कोणती? मला काय करायचे आहे अशा प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधून कामाला कार्याला लागले पाहिजे

सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे, सर्वांना जगण्याचा समान हक्क दिला आहे जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे कसे जगायचे ते आपण ठरवायचे आपल्या जीवनात जगताना आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडता आल्या पाहिजेत आपल्या कार्यामुळे दुसऱ्याला दुःख वेदना त्रास होऊ नये ही आपली माणसातील माणुसकी व जबाबदारी आहे ती सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे ईश्वराने दिलेला देह अनमोल आहे एकदा का तो गेला की संपला !म्हणून त्याला योग्य सांभाळलं पाहिजे कारण “देह देवाचे मंदिर आत आत्मा पांडुरंग!” प्रत्यक्ष ईश्वर आपल्या शरीरात वास करीत असतो आपले शरीर हे नाशिवंत आहे नाश पावणारे आहे हाडामासाचा देह विटला , नासला, ज्याप्रमाणे शिजवलेलं अन्न दोन चार दिवसात खराब होते, दूध नासून जाते, भाजी विटून जाते, अगदी तसाच हा नाशिवंत आहे “”नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान!”

सौंदर्य असेपर्यंत सगळं काही चांगलं राहतं पण शेवटी मात्र आपण एकटेच असतो सगळ्यांमध्ये असून आपण एकटेच असतो कारण आपल्याला स्वतःला एकट्यालाच मरायचे असते हे ऐकून मनाला खूप खूप भीती वाटते कमीत कमी एक माणूस तरी आपल्यासोबत आला असता तर खूप बरे झाले असते कारण माणसाला कोणी ना कोणी साथीदार हवा असतो झाडाला घट्ट पकडून ठेवण्यासाठी त्याच्या मुळा असतात ,इमारतीला पक्की ठेवण्यासाठी त्याचा पाया मजबूत असतो ,वाहनाला पळण्यासाठी त्याच्या चारी बाजूने चार चाके असतात आणि त्या वाहनाला पळता यावे म्हणून एक व्यवस्थित रस्ता असतो अगदी तसेच परमेश्वराने आपल्या शरीराला पक्व बनवलेला आहे जीवन जगण्यासाठी संसार हा रस्ता, मार्ग दाखवून दिला आहे! आपले कुटुंब आणि आपण या सर्वांचा सांभाळ करत करत जगायचं असतं माणसाच्या जीवनात विविध प्रकारच्या घटना सर्रासपणे घडतात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अंदाजे शंभर वर्षांचा कालखंड संपेपर्यंत माणसाला सुख दुःख ,गरिबी, हलाखी ,परिश्रम ,आनंद, रोगजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती ,उन्हाळा, पावसाळा हिवाळा अशा विविध संकटांना सामोरे जात कधी हसत हसत, तर कधी रडत रडत हे आयुष्य संपवायचं असते

प्रत्येकाला हे जग ,हे सौंदर्य सोडून जावयाचे आहे हा आनंद सोडून जायचे आहे म्हणून या देहाचा उद्धार करायचा असेल तर चांगले कार्य सतत करावे लागेल जेवढ तुम्ही चांगलं कार्य कराल तेवढं तुमच्या जीवनात चांगलं होईल हे निर्विवाद सत्य आहे ही चिरकाल टिकणारी बाब आहे संतांनी सांगितलेली सर्व उदाहरणे बरोबर आहेत जे” का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा “पवित्र मनाने शुद्ध अंतकरणाने राहणारा प्रत्येक माणूस हा संता सारखाच आहे मग एक गोष्ट आता आपल्या लक्षात आली की एक दिवस प्रत्येकाला आपला हा देह सोडून द्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण जुने कपडे टाकून देऊन नवीन कपडे परिधान करतो अगदी त्याप्रमाणे या जीवाचे सुद्धा आहे तरीही माणूस किती स्वार्थी लोभी प्रवृत्ती माणसामाणसात दिसून येते एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना बाकी चार बोटे आपल्याकडे असतात दुसऱ्याचे तोंड काळे करायचे म्हटलं तर अगोदर आपले हात काळे करावे लागतात असं म्हणतात की उपकाराने उपकार फिटणार नाहीत तर ते फक्त समाधानाने फिरतात

आजच्या आधुनिक युगात माणसाजवळ सगळं काही आहे फक्त एक गोष्ट नाही ती म्हणजे समाधान सप्तरंगी जीवन जगण्यासाठी माणसाजवळ समाधान शांती असणे महत्त्वाचे आहे आपला मातीचा देह आहे चिखलाचा बनवलेला देह आहे शेवटी तो जळून खाक होणार आहे मातीत मिसळतो मातीचा देह पुन्हा काय चिंतित व्हावे मग प्रत्येक जन्म घेणाऱ्याला अंत आहे आणि अंतिम टप्पा म्हणजे त्याला आपल्याच काळ्या मातीत मिसळून जायचे आहे माती मोलाची आहे, मातीत जन्मतो, मातीत मरतो, ही माती श्रेष्ठ आहे! मौलिक आहे माती कष्ट, आहे माती धन आहे ,माती हिरा, आहे मोती आहे ,माती पाचु आहे मना मनातला म्हणून——

Related posts