27.5 C
Solapur
September 27, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

अपसिंगा येथे आ. कैलासदादा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

तुळजापूर तालुका प्रतिनिधी/पुरूषोत्तम विष्णु बेेले

उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणी, अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आ. कैलासदादा पाटील यांनी सर्व शिवसैनिकांना आपला वाढदिवस हा साधेपणाने हार-तुरे न आणता सामाजिक उपक्रम राबवून करण्याचे आवाहन केले होते.

त्यांनी केलेल्या आवाहनाला साद घालत आपसिंगा येथे शिवसैनिक ग्रा. पं. सदस्य आमीर शेख यांच्या वतीने दिव्यांग मुलीस व्हील चेयर, गाव स्वच्छता करणाऱ्या महीलांना साडी, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. हॉटेल चालक यांना कचरा कुंडी वाटप, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, जि.प.प्रा.शाळा येथे वृक्षारोपण करून विविध सामाजिक शालेय उपयोगी, गृहोपयोगी, साहित्य धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख सतिश कुमार सोमाणी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी धाराशिवचे शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी, सरपंच अमोल मुळे, विभाग प्रमुख मुकेश पाटील, सौदागर जगताप, चेतन बंडगर, दिपक सोनवणे (उपसरपंच) ज्योतिराम सुरडकर, अजित क्षीरसागर, ग्रा. पं. सदस्य, राहुल गोटे ग्रा.पं.सदस्य, नागनाथ खोचरे, ग्रा. पं. सदस्य, सौदागर गोटे ग्रा.पं.सदस्य, शक्ती पांडागळे ग्रा. पं. सदस्य, महेश पवार, बालाजी पांचाळ, सिद्राम कारभारी, यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts