पंढरपूर/प्रतिनिधि
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पत्नी सौ.अंजलीताई आवताडे यांनी पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठ अनिल नगर,काशीकापडी गल्ली, हरिहर महाराज मठ ,काँटेज हाँस्पिटल परिसर,जुनी पेठ पोलीस चौकी या परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला यावेळी येथील यहिलांनी प्रंचड प्रतिसाद दिला.
यावेळी अंजलीताई आवताडे यांनी विकासाच्या मुद्यावर त्यांनी भर देऊन पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील सर्व विकास कामे,बेरोजगारांच्या साठी एमआयडीसी, महिला ना आर्थिक बाबतीत सबला करण्याचे अभिवचन त्यांनी यावेळी मतदारांना दिले.
या प्रचार रँलीमध्ये अंजलीताई आवताडे यांना जनतेतून प्रंचड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.