पंढरपूर

पंढरीत मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद

एका बुलेट सह दहा मोटारसायकल जप्त
शहर पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामगिरी ३ लाख ४५ हजारचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर सह सातारा, सांगली, इंदापूर येथून चोरल्या होत्या मोटर सायकल.

पंढरपूर(प्रतिनिधी):-

पंढरपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या विविध ठिकाणाहून नागरिकांच्या मोटर सायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते याची दखल घेत पंढरपूर शहर पोलिस व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गंभीर दखल घेत त्यांना येथील जुना पेठेत राहणारा आकाश फिरंगीनाथ बामणे हा आपल्या साथीदारांसह मोटरसायकल चोरी करत असल्याची माहिती मिळतात सदर पथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बुलेट सह दहा मोटारसायकली जप्त करण्यात आले असल्याची माहिती आज उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख नवनाथ गायकवाड सह पथक उपस्थित होते.

आरोपी आकाश फिरंगी नाथ बामणे यात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार सह पंढरपूर शहर तसेच सातारा सांगली इंदापूर येथून मोटरसायकल चोरले असल्याचे निष्पन्न झाले. त्याने हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच १३ सी एन ६२०१ अंदाजे किंमत पंचवीस हजार, यामाहा कंपनीची वाय बी आर मॉडेलची बिगर क्रमांकाची मोटरसायकल अंदाजे किंमत पंचवीस हजार, हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची बिगर नंबर ची मोटर सायकल अंदाजे किंमत पंचवीस हजार, होंडा कंपनीची शाईन मॉडेल ची मोटरसायकल बिगर क्रमांकाची अंदाजे किंमत तीस हजार, हिरो कंपनीची एच एफ डीलक्स मोटरसायकल बिगर क्रमांकाची अंदाजे किंमत पंचवीस हजार, हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मॉडेल ची मोटरसायकल बिगर क्रमांकाची अंदाजे किंमत पंचवीस हजार, हिरो होंडा कंपनीची एचएफ डीलक्स मॉडेल ची मोटरसायकल बिगर क्रमांकाची अंदाजे किंमत पंचवीस हजार, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मॉडेल ची मोटरसायकल बिगर क्रमांकाचे अंदाजे किंमत पंचवीस हजार, हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेल ची मोटरसायकल बिगर क्रमांकाच्या अंदाजे किंमत ४० हजार तसेच रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट क्लासिक ५०० मोटरसायकल अंदाजे किंमत १ लाख २५ हजार अशा दहा मोटरसायकली सदर आरोपींकडून जप्त करण्यात आले असून याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३ लाख ४५ हजार रुपये होत असून अजून या आरोपीने मोटरसायकली चोरले आहेत का व ते कुठून चोरले आहेत कोठे ठेवले आहेत याबाबतची अधिक माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख नवनाथ गायकवाड व त्यांचे पथक करीत आहे सदर गुन्हेगारावर मोटरसायकल चोरीबाबत मिरज शहर विटा इंदापूर करकम पंढरपूर शहर इत्यादी ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आरोपीचा एक साथीदार फरार असून पंढरपूर शहर हद्दीतील आणि परिसरातील आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने आरोपीचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे, बिपिन चंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, गणेश पवार, सतीश चंदनशिवे, मच्छिंद्र राजगे, प्रसाद आवटी ,संदीप पाटील, सिद्धनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश पवार हे करीत आहेत.

Related posts