नवरात्र महोत्सव ते विजयादशमी
आपला देश हा सणावारांचा देश म्हणून ओळखला जातो तसा तो कृषिप्रधान देश व आपली भारतीय संस्कृती ही जगात प्रसिद्ध संस्कृती आहे आपल्या देशात विविध ऋतूमध्ये ऋतूला अनुसरून विविध सण व उत्सव साजरे करण्याची महत्त्वाची परंपरा आहे सर्वात मोठा व अखंड भारतात आनंदाने साजरा केला जाणारा महोत्सव म्हणजे नवरात्र महोत्सव व विजयादशमी सोहळा होय परंतु यावर्षी कोरोणाच्या संकटामुळे महामारी मुळे नवरात्र महोत्सव व विजयादशमी सोहळा अत्यंत सुनासुना वाटत आहे कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली लाखो भक्त आपले आराध्य महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगत्जननी जगन मा पा आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात देवीवर असलेली त्यांची निष्काम भक्ती सेवा पाहून अक्षरशः मन गहिवरून येते शेकडो किलोमीटर पायी चालत येणारे भक्त उपवाशी तापाचे ऊन वारा पाऊस थंडी याची कसलीही भीती न बाळगता देवीच्या दर्शनासाठी दरबारात येतात व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेतात चालताना पायाला फोड येतात पायाला जखमा होतात त्यावर चिंध्या बांधून हे फक्त आपली पायवाट चालू ठेवतात.
दहा दहा लाख भक्तांच्या भक्तीचा उत्सव महोत्सव म्हणजेच नवरात्र महोत्सव होईल आपल्या पवित्र तुळजापूर त्री भक्तीचा महापौर संपूर्ण नवरात्र ते पौर्णिमेपर्यंत बघायला मिळतो पाळणे खेळणे फुगेवाले मिठाई वाले पेढेवाले प्रसाद वाले त्यातच चहाची दुकाने नाश्त्यासाठी जेवणासाठी हॉटेल फुल वाले हार वाले आलेल्या भक्तांना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था कडाक्याच्या थंडीमध्ये केली जाते शहरातील व शहराबाहेरील हॉटेल लॉज भक्त निवास सर्व भक्तांनी भरून फुलून गजबजून गेलेला याचवेळी पोलिस विभागाची उत्कृष्ट कामगिरी सुरक्षा यंत्रणा सर्व परिसर पोलिस व सुरक्षा बंदोबस्त नगरपालिकेचे कौतुक कौतुकास्पद उत्कृष्ट नियोजन सर्व कर्मचारी वर्ग आनंदाने आपापल्या कामाच्या ठिकाणी व्यस्त काही सामाजिक संघटना व समाज कार्यकर्ते भक्तांच्या व्यवस्थेत तल्लीन झालेले बघायला मिळतात मंदिर संस्थान व व्यवस्था व्यवस्थापनाच्या वतीने खूप मोठे सहकार्य व भक्तांची सोय केली जाते देशातील या महान महोत्सवात देवी ची सेवा करण्याची संधी मलाही प्राप्त झाली हे माझे खूप मोठे भाग्य आहे मुंगीच्या मुखामध्ये असलेल्या अण्णाच्या कना एवढी सेवा करण्याची संधी मिळाली एखाद्या मोठ्या महोत्सवात स्वच्छता व घनकचऱ्याचे व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट सुरळीत पणाने करणारे सर्व स्वच्छता कर्मचारी भक्त मोठ्या आनंदाने सेवा करतात या महोत्सवातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो नव्हे तर हजारो बसगाड्यांची व्यवस्था केली जाते देवीचे दर्शन करून परत जाताना भाविक भक्तांना या बसेस बसचा उपयोग होतो पण यावर्षी हा आनंद कोरूना च्या पार्श्वभूमीवर थोडा बाजूला ठेवून स्वतःची सुरक्षितता दुसर्याची सुरक्षितता लक्षात घेऊन विजयादशमी साजरी करावयाची आहे मंदिरात रस्त्यावर कुठेही गर्दी होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे व आपली सुरक्षितता आपण केली पाहिजे सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा सुरक्षित दसरा साजरा करूया कोरोनाला हरवू या।
धन्यवाद।
लेखक
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर.