साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तूळ) येथे आयोजित शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिवचे लोकप्रिय आमदार मा. श्री. कैलास (दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून, या स्पर्धेचे उद्घाटन दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले.
या आमदार चषकाचे उद्धाटन आज रविवार, दिनांक 7/2/2021 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेनेचे धाराशिव चे पंचायत समिती सदस्य मा. संग्राम देशमुख व मा. गजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रविण कोकाटे तसेच प्रमुख पाहुणे शिवसेना तालुका प्रमुख मा. जगन्नाथ गवळी, शिवसेना तुळजापूर शहर प्रमुख मा. सुधीर कदम या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळा संपन्न झाला.
तालुक्यातील खेळाडूंच्या खिलाडी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे यावेळी या स्पर्धेचे संयोजक तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख मा. रोहित नागनाथराव चव्हाण यांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच तालुक्यातील जास्तीतजास्त संघांनी या स्पर्धेचा लाभ घेत या स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ गवळी व उपतालुकाप्रमुख श्री. रोहित चव्हाण यांनी यावेळी केले.
यावेळी युवा सेना जिल्हा चिटणीस लखन कदम, शिवसेना उप-तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, युवा सेना शहरप्रमुख सागर इंगळे, हंगरगा तुळ चे सरपंच मधुकर भंडारी, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शाम माळी, आमिर शेख, काका नन्नवरै, उपसरपंच अमोल नन्नवरै,
दशरथ चौगुले, शंकर गव्हाणे, फारूक शेख, उदय पाटील, प्रितम जाधव, सिद्राम कारभारी, लक्ष्मण माळी, बजरंग धोंगडे, रवी पाटील, भारत पाटील, बळी धोंगडे, संजय सोनटक्के, प्रविण क्षिरसागर, महादेव चव्हाण, आकाश हंगरगेकर, सुरज चौगुले, सौरभ चव्हाण, नितीन ढेकणे, चेतन चव्हाण, तसेच शिवसैनिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.