पुरूषोत्तम विष्णू बेले,
तुळजापूर तालुका
प्रतिनिधी.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ गीता सुधाकर वाघमोडे तर उपसरपंच पदी श्री विजयकुमार प्रभाकर जाधव यांची आज नियुक्ती झाली.
पिंपळा (बु.) येथील सरपंच पदी सौ. गीता सुधाकर वाघमोडे तसेच उपसरपंच पदी मा. विजयकुमार प्रभाकर जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच यांच्यासह सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व सर्वाना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
#पिंपळा (बु) ग्रामपंचायत चे नूतन शिलेदार :
१) सौ. गीता सुधाकर वाघमोडे (सरपंच)
२) श्री. विजयकुमार प्रभाकर जाधव (उपसरपंच)
३) श्री. संग्रामराजे धैर्यशील राजेपांढरे
४) श्री. योगेश मारुती गवळी
५) श्री. बाळू छानबा सिरसट
६) सौ. नीलम सोमनाथ मोरे
७) सौ. सुरेखा लक्ष्मण चव्हाण
८) सौ. त्रिशाला कृष्णाथ चौगले
९) सौ. अर्चना राजेंद्र जाधव
बिनविरोध झालेल्या विजयाचा तसेच नूतन नियुक्त्यांचा यावेळी सर्व नूतन लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत तसेच मिलेल्या संधीचे सोने करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या पंचवार्षिक कार्यकाळात सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन यावेळी नूतन लोकप्रतिनिधींच्या मार्फत देण्यात आले.
या सत्कार समारंभावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ (दाजी) गवळी, नूतन सरपंच सौ. गीता वाघमोडे, उपसरपंच श्री. विजयकुमार जाधव, नूतन सदस्य श्री. संग्रामसिंह राजेपांढरे, श्री. योगेश गवळी, श्री. बाळू सिरसट, सौ. नीलम मोरे, सौ. सुरेखा चव्हाण, सौ. त्रिशला चौगुले, सौ. अर्चना जाधव, मा. उपसरपंच बालाजी खराबे, सीताराम पाटील, मा. सदस्य बालाजी चुंगे, सोमनाथ मोरे, सुधाकर वाघमोडे, प्रशांत पाटील, दयानंद चव्हाण, संजय डोलारे, पोपट सिरसाट यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
जनतेने गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ठेवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे जाहीर आभार. जनतेच्या या प्रेमापोटीच जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध
गावातील होणारे भांडण-तंटे दूर करत, ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली असून, जनतेने मागील 20 वर्षांपासून अबाधित ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो व मी कायमस्वरूपी आमचे नेते, धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख आ. कैलासदादा पाटील यांच्या साहाय्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहीन असे वचन देतो. सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी मनक:पूर्वक शुभेच्छा.
श्री जगन्नाथ मनोहर गवळी-भोसले
(शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)