साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
तुळजापूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून विकी बाबा वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
विकी वाघमारे हे सध्या बैलगाडा शर्यत संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अन्नदान, सार्वजनिक शिवजयंती उत्सव, विविध सार्वजनिक उत्सव, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा अग्रेसर सहभाग असतो. शिवबाराजे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंखे यांच्या उपस्थिती हा प्रवेश करण्यात आला.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे, खा. अरविंद सावंत, आ. रवींद्र वायकर, शिवबाराजे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंखे उपस्थिती होते.