33.1 C
Solapur
February 13, 2025
उस्मानाबाद  तुळजापूर

लोहगाव येथे सेवानिवृत्त मेजर अप्पाराव होळे यांच्या भव्य सत्कार.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय प्रतिनिधी-मराठवाडा

लोहगाव ता. तुळजापूर येथे भारतीय सैन्य दलात १७ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले मेजर आप्पाराव होळे यांची गावाच्या वतीने भव्य मिरवणूक करून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव नगरीचे सुपुत्र, मेजर आप्पाराव होळे भारतीय सैन्य दलात १७ वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. गावात त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.लोचना रविंद्र दबडे यांच्या हस्ते औक्षण करून त्यांचा यथोचित सत्कार रविंद्र अशोक दबडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मेजर आप्पाराव होळे यांनी भारतमातेसाठी जे योगदान दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. केलेल्या सत्काराबद्दल सेवानिवृत्त मेजर आप्पाराव होळे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष विनायक काटकर, ग्रा.स.सौदागर दबडे, सुनील पाटील, निजाम शेख, नितीन काटकर, विनोद दबडे, श्रीकांत माने, श्रीनिवास दबडे, अतुल पाटील, श्रीराम तरुण गणेश मंडळ, छत्रपती संभाजी मंडळ, जय हिंद मंडळ, क्रांती तरुण मंडळ, जय मल्हार तरुण मंडळ, मित्र प्रेम तरुण मंडळ, अहिल्यावती तरुण मंडळ या सर्व मंडळाचे कार्यकर्ते, संयोजक मनोज पाटील आणि विजय पाटील हे सर्व उपस्थित होते.

Related posts