26.2 C
Solapur
September 21, 2023
उस्मानाबाद 

कळंबच्या अवलियाची कमाल

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला कळंब शहरातील 102रुग्णवाहिकेचे चालक श्री बारगुले यांनी कौतुकास्पद काम केले आहे त्यांनी पदर खर्चाने एसटी महामंडळाची कळंब ते उस्मानाबाद जाणारी एक बस तर 102 क्रमांकाचा रुग्णवाहिके मध्ये स्वयंचलित निर्जंतुकीकरण मशीन मोफत बसवून दिली आहे.बारगुले हे अल्पशिक्षित असून जेमतेम परिस्थिती असून सुद्धा असे प्रेरणादायी काम करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या निर्जंतुकीकरण मशिनमुळे एसटीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवासी त्यासह संपूर्ण बस निर्जंतुकीकरण होऊन निघत आहे

कळंबच्या अवलियाची कमाल

प्रत्येक फेरी झाल्यानंतर एसटी बस किंवा रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण करणे जोखमीचे आहे.तसेच कुणालाही या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये हाच विचार मनामध्ये ठेवून श्री बारगुले यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जीवन वायदंडे,आरोग्य सहायक श्री जाधव बी एन यांनी आभार मानून कौतुक केले आहे.तर समाजातील ज्या लोकांना शक्य आहे अश्या सर्वानी समाजोपयोगी काम करण्याची गरज असल्याचे यावेळी डॉ जीवन वायदंडे यांनी सांगितले.

Related posts