तुळजापूर

मा. मुख्यमंत्री यांनी केली अपसिंगा व कात्री गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री सन्मानीय मा.ना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कात्री व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती व नुकसानीची पाहणी केली.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

अपसिंगा ता. तुळजापूर: दिनांक 21. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये धीर धरावा हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशी मदतीबाबत या शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शेतकरी बांधवांना दिली. मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे साहेब यांनी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा कात्री या गावात भेट दिली, सुरुवातीस मा.मुख्यमंत्री साहेबांनी अपसिंगा शिवारातील शेतकरी चंद्रकांत सुरडकर यांच्या शेतातील सोयाबीन व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली, यावेळी शिवसैनिक तथा ग्रामपंचायत सदस्यअमीर शेख यांनी गावच्या व ग्रामपंचायत च्या वतीने उद्धव साहेबांना निवेदन दिले.

त्यानंतर कात्री येथील पुलाजवळ शेतकरी श्री जमदाडे यांच्या शेतात पुरामुळे शेतातील पीक व माती वाहून गेल्याचे पाहणी केली, व शेतकऱ्यांना धीर दिला सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले, त्यानंतर कात्री ग्रामपंचायत समोर उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व ज्या शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली दगावली त्यांना प्राथमिक स्वरूपात रोख धनादेश वाटप केले.*सुवर्णा बाळू लोके 30000,*अर्चना युवराज पाटील 25000,*हिराबाई दत्तू कटक दौंड 30000, या शेतकऱ्यांना धनादेश साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


ज्या शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली दगावली त्यांना प्राथमिक स्वरूपात रोख धनादेश वाटप केले.

साहेबांचा दौरा परतत असताना अपसिंगा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसैनिक अमीर शेख यांनी साहेबांची गाडी गावच्या वेशी जवळ थांबवून नदीला पूर आल्यामुळे पाण्यामुळे घरांचे नुकसान झाले बऱ्याच जनांचे घरगुती साहित्य वाहून गेले अशी माहिती दिली तसेच घरांची अधिक पडझड झालेल्या व्यक्तींना तात्काळ घरकुल मंजूर करण्याची विनंती केली. साहेबांनी नागरिकांचे अडचणी जाणून घेऊन , अडचणी सोडवणे बाबत आश्वस्त केले. यानंतर शिवसैनिक बालाजी पांचाळ यांची कन्या शिवांजली पाच वर्ष ही उद्धव साहेबांना जाता-येता दारात येऊन भगवा झेंडा फडकवून त्यांचे स्वागत करीत होती मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवून शिवांजली ला शुभाशीर्वाद दिले. व मार्गस्थ झाले.


मा. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवून शिवांजली ला शुभाशीर्वाद दिले.

या दौऱ्याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, मंत्री संदिपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील, धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, लातूर ग्रामीणचे आ.धिरज विलासराव देशमुख, माजी आ.ज्ञानेश्वर पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, सुनिल चव्हाण, महिला आघाडी श्यामलताई वडने, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अमिरभाई शेख, विभागीय सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सिद्धराम कारभारी यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts