उस्मानाबाद 

राज्यमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी स्थानिक आमदार व खासदार यांच्या समवेत उस्मानाबाद तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

उस्मानाबाद (धाराशिव) तालुक्यातील जुणोनी, वलगुड, झरेगाव, चिलवडी, सुर्डी,बेगडा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्याचे महसूल राज्यमंत्री मा. ना.अब्दुल सत्तार साहेब, खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच आ. कैलासदादा पाटील यांनी अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली.

शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट भीषण आहे. सोयाबीन, तूर, भाजीपाला, द्राक्ष बागा आणि ऊसाचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. तर काही ठिकाणी पशुधन, शेत वाहून गेले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश मा. मंत्रीमहोदयांनी अधिकारी वर्गाला दिल्या.

पुरामुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

पाहणी नंतर जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्य मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.

अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान प्रचंड आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्यांना नव्याने उभारणी देण्यासाठी नुकसान भरपाई बाबत तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी विनंती मा. आ. कैलासदादा पाटील यांनी यावेळी केली.


कळंब-धारशिवचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा. कैलास (दादा) पाटील व मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दुचाकीवरून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.

यावेळी धारशिवचे लोकप्रिय खा. मा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलासदादा पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख श्री.सतिशकुमार सोमाणी, मा.नगरसेवक श्री.बाळासाहेब शिंदे, मा.पं.समिती उपसभापती श्री.शाम भैय्या जाधव, अभिजित देशमुख, विभागप्रमुख सौदागर जगताप, जुणोनीचे मा.सरपंच अमोल मुळे, बेगडा मा. सरपंच दिपक देशमुख, शाखाप्रमुख चंद्रकांत काळे, महेश देशमुख, उदय पाटील, नाना पाटील, प्रितम जाधव, अमोल जाधव, महेश धोंगडे, लक्ष्मण ढोकळे, रविंद्र देशमुख, गोविंद माने, सुनिल देशमुख, बाळासाहेब देशमुख, अमोल देशमुख, धनंजय तट, कालिदास तट, माणिक बागल, तहसीलदार श्री.गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी श्री.डी.आर.जाधव, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts