साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखा उस्मानाबाद च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ साहेब यांच्या 74 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा शाखा उस्मानाबाद कडून मा. जिल्हा अध्यक्ष महादेव माळी यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
जिजामाता वस्तीगृह येथे उभारलेल्या तात्पुरत्या कैदी विलगीकरण कक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. संजयजी निंबाळकर (सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांच्या अध्यक्षतेखाली व तुरुंग अधिकारी मा. श्री. बलभीम माळी यांच्या उपस्थितीत कैद्यांना करमणूक व्हावी म्हणून एका टेलीव्हिजन संचाचे तसेच कैद्यांना देण्यात येणारे अन्न गरम रहावे म्हणून हॉट पॉट चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता परिषद चे जिल्हा कार्याध्यक्ष कुणाल निंबाळकर, तालुका अध्यक्ष रॉबिन बगाडे, शहराध्यक्ष शाहनवाज सय्यद, संतोष भोजने, दत्ता माळी, सौदागर माळी, अशोक भोसले, जयंत देशमुख, रियाज शेख, अजय पाटील, अमोल माळी, सौरभ देशमुख,सचिन चौधरी, किशोर माळी, महेश सुरवसे, सुनील पेठे, अनुराग गाडेकर, प्रणव देशमुख, ओम भांगे यांनी परीश्रम घेतले.