30.3 C
Solapur
February 10, 2025
Blog

निष्ठा, प्रामाणिकपणा व साधेपणा हा रक्तातच असावा लागतो.

संग्रहित:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

नाव—शिवाजीराव जाधव…वय वर्ष ६७..राहणार–तुळजापूर..दोन मुले प्रोफेसर आहेत,बागायती शेती…बंगला,गाडी सर्व सुख-संपन्न ऐसें जीवन….तरीही १५ दिवस रायगडावर काम अन ७ दिवस घरी अन पुन्हा ७ दिवसांनी गडावर…

त्यांची वाक्ये..बाळा,महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं..आई तुळजाभवानी नि दिलेली तळपती भवानी तलवार या मातीत खेळली..त्या मातीत मला काम करण्याचं भाग्य लाभतय..या फरसबंदीच्या चिरा अनेक पुढील पिढया पाहतील अन माझ्या आज्या,पंज्या चा या कामाला हात लागलाय अस अभिमानाने सांगतील,

डाक्टर म्हणलाय,काम करत रहाल तर अजून वरीस जगाल…आता इथं काम करता करता मरण आलं तरी बेहत्तर, म्हणून एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्री येण्याचा योग आई तुळजाभवानी ने घडवून आणलाय अन मी मलाच पुण्यवान समजतो… असं म्हणत दगडावर छंनी हातोड्याचे घाव पडू लागले…

बाबा,इकडे बघा म्हणल्यावर मस्त मिश्यावर त्यांनी ताव मारला अन स्मितहास्य दिले😍😍

आताच्या काळात कधी रायगडी गेलाच तर हत्ती तलावाच्या वरच्या बाजूला छन-छन दगडाच्या आवाजाचा मागोवा घेत बाबांना नक्की भेटा…

@Mohan Edhate

Related posts