Blog

पराक्रम दिन ; नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

=================================================================================================

आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आपल्या भारताचे महान क्रांतिकारी, ज्यांचे नाव घेताच आपल्या अंगावर रोमांचउभे राहाते शूर, वीर ,धाडसी, साहसी, बलाढ्य इंग्रजांच्या जुलमी सत्तेला, राजवटीला सुरुंग लावून हादरवून सोडणारे, ज्यांनी खरोखरच भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावून देश सेवा केली समर्पण केलं असे महान क्रांतिकारी नेताजी सुभाष चंद्र बोस होय त्यांचा जन्मदिन शासनाने पराक्रम दिन म्हणून साजरा करावा असे घोषित केले आहे

त्यांनी केलेला स्वातंत्र्याचा पराक्रम हा भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासात अजरामर झालेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात आझाद हिंद फौजेचे नेतृत्व करणारे एकमेव सेनानी म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस होय आज त्यांच्या जयंतीदिनी नवीन युवकांना त्यांच्या कार्याची, त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची, त्यांच्या देशप्रेमाची ओळख करून देण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न पारतंत्र्य काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा लोकप्रिय नेता मिळाला म्हणून जनतेने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपला नेता मानले व त्यांच्या पाठीशी लाखो देश प्रेमीउभे राहिले। देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेतली अशा महान क्रांतिकारी सुभाष चंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन !

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती आपण साजरी करीत आहोत भारताचे लाडके सुपुत्र, आझाद हिंद फौजेचे सुप्रीम कमांडर, महान सेनानी, स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसामधील कटक या गावी 23 जानेवारी अठराशे 97 मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकिदास बोस, तर आईचे नाव प्रभादेवी असे होते सुभाष चंद्र बोस यांना सात भाऊ व सहा बहिणीअसा मोठा परिवार होता लहानपणापासून अभ्यासात रुची प्राथमिक शिक्षण कटक येथे पूर्ण झाले त्यांना लहानपणीच मेहनती अभ्यासू व देश प्रेमी शिक्षक लाभले त्यांचा लाभ त्यांच्या भावी आयुष्यात झाला आपल्या कॉलेज जीवनातच त्यांनी स्वातंत्र्याची लढाई सुरू केली चित्तरंजन दास यांना ते आपले गुरू मानत असत त्यांचा प्रभाव जनतेवर त्यावेळी खूप मोठा होता कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा असं म्हणत त्यांनी संपूर्ण देशभरातील देशभक्तांना एकत्रित केले

सुरुवातीला एक वकील म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे त्यांच्यावर स्वामी विवेकानंदाच्या विचारांचा खुप मोठा प्रभाव पडला व त्यांचे व्यक्तिमत्त्व धाडसी बनले नव युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी, त्यांच्या मनात देशभक्ती निर्माण होण्यासाठी त्यांचा पराक्रम त्यांचे शौर्य,उलेखनीय आहे आलेल्या संकटांना तोंड देणे, त्याचा मुकाबला करणे, त्यांचा स्वातंत्र्यासाठी केलेला पराक्रम पाहून शासनाने सुद्धा 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करावा असा आग्रह धरलेला आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत सुभाषचंद्र बोस यांना जवळजवळ अकरा वेळा जेलमध्ये जावे लागले आहे आपणा सर्वांना माहितीच आहे

गांधीजींचे देशव्यापी आंदोलन सुरू होते इंग्रजांना चले जाव ची घोषणा केलेली होती अशावेळी 1939 मध्ये जागतिक महायुद्धाची सुरुवात झालेली होती अशा परिस्थितीत सुभाषचंद्र बोस इतर देशांच्या चांगल्या संपर्कात होते त्यावेळी इंग्रजांशी आपण संघर्ष करू व भारताला स्वातंत्र्य मिळवून देउ असा मोठा विश्वास नेताजी सुभाष चंद्र बाबूंचा होता बऱ्याच वेळा वेगवेगळी वेशभूषा करून त्यांनी इंग्रजांना धूळ चारली होती सळो की पळो करून सोडले होते तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा । आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून विदेशातील हजारो भारतीय नव युवक भारताच्या स्वातंत्र्याच्या या लढाईत उतरले होते भारतभर देशभक्तीची लाट उसळली होती

सुभाषबाबू बद्दल आदराची भावना ,विश्वासाची भावना, देशप्रेमाची भावना, निर्माण झाली होती अशातच त्यांनी आकाशवाणीवरून देशभक्तीचे, देशप्रेमाचे भाषणे केली ही भाषणे ऐकून भारतीय जनता भक्तिरसात न्हावून निघत असे एक प्रकारे देशभक्तीचे वारे वाहू लागले लहान थोर महिला पुरुष वृद्ध अशा सर्वांनी भारताला स्वातंत्र्य करण्याचा विडा उचलला व सर्व देशभक्त सुभाषबाबूंच्या पाठीशीउभे होते स्वातंत्र्याची हे काम करत असतानाच शेवटी अचानक 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असे जाहीर करण्यात आले शेवटी सुभाषबाबूंच्या मृत्युचे गुढ हे गूढच राहिले त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत भारत स्वतंत्र झाला पण स्वतंत्र झालेला भारत बघण्यासाठी दुर्दैवाने सुभाषबाबू राहिलेले नव्हते परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले होते अन्यायी अत्याचारी अशा इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला होता अशा या महान क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना व त्यांच्या समर्पणाला त्रिवार वंदन!!

जय हिंद- जय भारत!

Related posts