Blog

आली आली दिवाळी— आनंदी आनंद घरोघरी——

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

भारतीय संस्कृतीत दीपावली हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो श्रीमंत असो वा गरीब असो आपापल्यापरीने कुटुंबात आनंद उल्हास प्रेमाने साजरा केला जातो सर्व जाती धर्मातील लोक आनंदाने एकत्र येतात सर्वधर्मसमभाव हे दिवाळीचे खास वैशिष्ट सांगता येईल दीपावली हा मुख्य पाच दिवसाचा सण असतो आणि या पाच दिवसाचे विशिष्ट असे महत्त्व आहे खरंतर एकादशी पासूनच दीपावली ला सुरुवात होते साधारणपणे एकादशी वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी श्री महालक्ष्मी पूजन गोवर्धन पूजन बलिप्रतिपदा पाडवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज होय अशाप्रकारे शुभ दीपावली हा मोठा सण साजरा केला जातो.

दिवाळी ही शुभ मंगल प्रसंगी घेऊन येते अगदी पंधरा दिवसा अगोदर पासून दिवाळीची सर्वत्र तयारी चालू होते घरांची स्वच्छता साफसफाई दुकानांची साफसफाई स्वच्छता रंगरंगोटी केली जाते आकाश कंदील हे दिवाळीचे खास वैशिष्ट व आकर्षण असते आकाश दिव्यांनी घर सुशोभित केले जाते प्रत्येक घरा घरा च्या दारावर गॅलरीत आकाश दीप लावला जातो पूर्वी हा आकाश कंदील घरची मोठी माणसं स्वतः घरच्या घरीच बनवत असत वेळूच्या छोट्या छोट्या गाड्या काट्या पासून साधा रंगीत कागद वेगवेगळ्या रंगाच्या कागदापासून नक्षीदार जाळीदार विविध आकाराचे आकाश कंदील केले जात असत दररोज संध्याकाळी आकाश कंदील लावले जातात शुभ व मंगल वातावरण तयार होते शेकडो वर्षापासून चालत आलेली ही आकाश कंदिलाची परंपरा होय आकाश कंदील यामुळे घर घर गाव गाव उजळून निघते सुवर्णमय आनंदमय प्रकाशमय चोरीकडे प्रसन्न वातावरण तयार होते जणूकाही आकाशच धरतीवर अवतीर्ण झाले आहे असा भास होतो.

भारतीय संस्कृतीत पण त्या म्हणजेच दिवा याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात तेजोमय मंगलमय प्रकाश निर्माण करून आपले घर परिवार परिसर सकारात्मक शुभ वातावरणाने उजळून टाकण्याचे काम छोटीसी पण ती करत असते म्हणून पूर्वीपासून दिव्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी दिवाळी सणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पणत्या दररोज सायंकाळी घराच्या दारात गॅलरीत तुळशीजवळ लावल्या जातात हे दृशअत्यंत सुंदर मनमोहक व प्रसन्न असते.

दीपावलीचे आणखी महत्त्वाची वैशिष्ट म्हणजे रांगोळी होय रांगोळी हे हे प्रसन्नतेच मांगल्याचे शुभ प्रतीक मानले जाते घरा घरात दारात सुंदर रांगोळी काढली जाते विविध रंगांचे विविध आकारांचे विविध कलाकृतीतून ही रांगोळी तयार केली जाते व वातावरण प्रसन्न मंगलमय केले जाते या दिवाळीच्या सणामध्ये फटाके उडवण्याची धमाल असते लहान थोर वृद्ध सर्वजण फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटतात दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करणे पूजा पाठ करणे व फटाके वाजवणे अमावस्येच्या दिवशी श्री महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते व श्री महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते जो तो आपापल्या परीने तयारी करतो व पूजा मनोभावे करतो.

दिवाळीचा पाडवा हा दिवस मराठमोळ्या लोकांचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सर्वजण आपापल्या आराध्य देवतेची पूजा करतात सर्व कलाकार आपल्या वाद्याची पूजा करतात विद्यार्थी पुस्तके वह्या पेन यांची पूजा करतात पाडवा हा दिवस पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच दिवाळीचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज होय या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते व शुभ आशीर्वाद देते भाऊ त्यादिवशी आनंदाने आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त करतो घरातील कुटुंबातील सर्वजण एकत्र येण्याचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय.

दिवाळीला घरोघरी गोड-धोड खाण्याची मेजवानी असते गोड पदार्थांमध्ये लाडू करंजी अनारसा गुलाब जामुन जिलेबी रसगुल्ला तसेच शंकरपाळे चिवडा शेव असे विविध पदार्थ केले जातात व एकमेकांना आनंदाने फराळासाठी बोलावले जाते व आनंद द्विगुणीत केला जातो अशाप्रकारे दिवाळी हा सण सर्व कुटुंबियांना एकत्रित आणण्याचा एकत्रित राहण्याचा एकत्रित जेवणाचा एकत्रित मनोरंजन करण्याचा सन मानला जातो पण आज या कोरोणाच्या महामारी मुळे आपणास सर्वांना खूप खूप काळजी घ्यावयाची आहे स्वतः सुरक्षित राहून माझे कुटुंब व माझी जबाबदारी सांभाळत आनंद घेत आनंद देत परंतु सुरक्षितपणे दीपावली साजरी करावयाची आहे आपण सर्वजण शासनाच्या नियमाप्रमाणे दिवाळी साजरी करूया व आनंद लुटूया सर्वांना शुभ दिपावली दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।

धन्यवाद . . . !🙏🏻🙏🏻

Related posts