साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या स्थानीक विकास निधीतून शिराढोन येथील श्री बालाजी मंदिर, खंडोबा मंदिर, माऊली महाराज मठ व दत्त मंदिरासमारे सभामंडप बांधकामासाठी २० लाख निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
धाराशिव-कळंबचे आमदार मा. श्री. कैलासदादा पाटील यांच्या मतदार संघात इ.स. २०२०-२१ या वर्षातील आमदार स्थानीक विकास कार्यक्रमाच्या निधीतून अनेक विकास कामांना गती आली आहे. निधी मंजूरी पत्र शिवसेनेचे प.स.सदस्य राजेश्वर पाटील, शहर प्रमुख आमोल पाटील, नितीन पाटील, कुमार पाटील, नासेर पठाण, पत्रकार राजेंद्र मुंदडा, दगडू पाटील, आवधूत पाटील, राजेंद्र खडबडे, किरण सहाणे, गोपाळ माळी या शिवसेनेच्या शिष्ठमंडळाकडे आमदार कैलास पाटील यांनी सुर्पूत्र केले.
यावेळी कळंब शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, बाळासाहेब जाधवर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.