असोसिएशनपेक्षा कमी दर करून फोटोग्राफी करणाऱ्यावर होईल कारवाई…
अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
दक्षिण फोटोग्राफर असोसिएशन सोलापूर यांच्या ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने फोटोग्राफी करणार्या फोटोग्राफरविरुद्ध होईल कारवाई असे मत दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सोनकंटले यांनी केले आहे.कोरोनो सारख्या महामारीच्या काळात फोटोग्राफर बंधू अनेक संकटांचा सामना करत गेली आठ महिने कोणत्याही प्रकारची फोटो ऑर्डर न करता कितीतरी फोटोग्राफर वर उपासमारीची वेळ आल्याने त्यातच तालुक्यातील फोटोग्राफर यांनी असोसिएशनने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दर घेऊन फोटोचे ऑर्डर करत आहेत तरी यापुढे अशा फोटोग्राफरची चौकशी करून त्यांच्यावर असोसिएशनच्या नियमांचे उल्लंघन करून फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफर वर कारवाई केली जाईल तरी सर्व फोटोग्राफर बंधूनी असोसिएशनचे नियमाचे पालन करण्यात यावे असे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष यांनी तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बंधूंना सांगण्यात आले आहे.
दक्षिण फोटोग्राफर असोसिएशन,सोलापूर यांच्या वतीने मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा नितीन थेटे यांना फोटोग्राफर असोसिएशनच्या दरापेक्षा कमी दर घेऊन फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरवर कारवाई व्हावे यासाठी असोसिएशन सोलापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.यावेळी दक्षिण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सोनकंटले,सचिव रवी कडचे, शिवानंद माळी,बापूराव पाटील,तुकाराम शेंडगे,सागर सपाने,मल्लिकार्जुन काळे आदि फोटोग्राफर उपस्थित होते…