Blog

आता जगायचं आणि पोट भरायचं कसं_ _ _?

कोरोना महामारी वर्ष 2020 एक दृष्टिक्षेप

————————————-
लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.
————————————-

2020 हे वर्ष महाभयंकर संकटाचे व अटीतटीचे जात आहे. हे वर्ष आपल्यालाच नव्हे तर, जगाच्या कायम स्मरणात राहील असे वर्ष होते. या वर्षाने बरेच नवनवीन अनुभव आपल्याला दिलेले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त आपण ऐकलेलं होतं की, पूर्वीचे आजार खूप भयंकर होते, उदाहरणार्थ प्लेग, कुष्ठरोग, बिमारी गड्डा, हावळ, कॅन्सर… इत्यादी. पण, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने महाभयंकर राक्षसासारखा आजार आज आपण अनुभवत आहोत. एक सूक्ष्म विषाणू, जो आपल्याला दिसतही नाही, अदृश्य स्वरूपातला कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगाला संकटात आणले आ.हे जी वस्तू आपल्याला दिसू शकत नाही, ती वस्तु इतकी शक्तिशाली असू शकेल याचा आपल्याला अंदाज येत नव्हता.

गेल्या वर्षभरात या महामारिवर कुठलाही कोणताही कसलाही उपाय सापडला नाही. जगभरातील डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक सर्वजण परेशान आहेत. जरी सापडला तरी, त्यावर लोकांचा विश्वास उरलेला नाही. लाखो जीवांचे नुकसान लाखोंचे प्राण गेलेले आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. अशावेळी करायचे तरी काय? आणि जगायचं तरी कसं ? हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभा टाकलेला आहे युद्ध महायुद्धामुळे जीवित हानी तर होतेच परंतु, या महामारिमुळे घरबसल्या, आपल्या गावात, आपल्या शहरात, गल्लोगल्ली याचा गुप्त पणाने प्रसार झालेला आहे. या रोगाचा शेवटचा विलाज म्हणजे मृत्यू होय. याला कुणीही टाळू शकत नाही.

महामारी या रोगामुळे सगळीकडे भीतीचे व दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. कोण कोणाला बोलायला तयार नाही. जो तो आपापल्या कामात सुरक्षेत गुंतला आहे. सरकारने उपाय म्हणून लॉक डाऊन केले. या सहा ते आठ महिन्याच्या कालावधीत मोठे उद्योगधंदे बंद पडले. कंपन्या बंद झाल्या. रोजगार संपले, लाखो लोक बेरोजगार झाले. आपण पाहतो, मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली सारख्या महानगरातून कर्मचाऱ्यांना घरी हाकलण्यात आले . ज्यांची नोकरी चालू आहे, त्यांचे पगार बंद झाले. रेल्वे गाड्या, बस सेवा, सर्व वाहतूक बंद झाले. अक्षरशहा लोक पायी चालत चालत उत्तर प्रदेश बिहार आपले राज्य आपले गाव गाठु लागले. मुलाबाळांना घेऊन उपास पोटी पायी पायी चालत राहिले. हो ऊन, वारा, पाऊस, वादळ थंडी याची तमा न बाळगता चालत राहिले.

जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होती शहरांमध्ये राहून त्यांचे सर्व पैसे संपले. घरातील सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू पदार्थ संपले. संपल्या भाड्याच्या घरात भाड्याचे पैसे द्यायला उरलेले नाहीत, काहींनी त्यांना घराबाहेर काढले. ही सर्व मंडळी बिचारी वाऱ्यावर पडले. ही झाली नोकरी करणाऱ्यांचे हाल, मोलमजुरी करणारे किंवा कर्मचाऱ्यांचे हाल इकडे आमच्या शेतकऱ्यांचे हाल बघवेना से झाले. वादळी वारा व पावसाने पिके सगळी वाहून गेली. त्यांच्या डोक्यावरचे आभाळ फाटलं, शेती वाहून गेली, शेतातील सर्व पिके डोळ्यासमोर वाहून गेली. काही शेतात आडवी झाली. बिचारा शेतकरी अश्रू ढाळत राहिला. भयंकर अशा या वादळात माणसानं जगावं तरी कसं ?आता आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरायचे तरी कसे या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला. ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांनी खावे तरी काय आणि जगावं तरी कसं अशी अवस्था निर्माण झाली.

या अवस्थेत सरकार तरी काय करणार समाजातील काही मोठ्या मनाची माणसे सामाजिक संघटना समाज कार्यकर्ते पुढे आले व त्यांनी वाटेल त्या पद्धतीने जसे जमेल त्या पद्धतीने अन्नदान चळवळ राबविली व ठीक ठिकाणी मदत केंद्र स्थापन करून अशा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांचे मानावे तेवढे लाख लाख आभार कमीच आहेत याच अवस्थेत कोरोनाच्या भयंकर संकटाने थैमान घातले हजारो जीवांचे बळी घेण्याचा सपाटा सुरू केला भीतीने थरकाप उडाला कोणी कोणाच्या जवळ यायला तयार नाही मधल्या काळात तर अक्षरशहा मृत्यूचे तांडव सुरू झाले माणसाने माणुसकी सोडून दिली कोण आपले आणि कोण परके जवळच यायची भिती निर्माण झाली.

लोक दुरून दुरून बघत होते दूर राहून बोलत होते आजही काही परिस्थिती वेगळी राहिली नाही ही तशीच गंभीर परिस्थितीला तोंड देत आपण जगत आहोत यातून काही तरी मार्ग निघेल काढला पाहिजे अशा या अवस्थेत एकमेकाला मदत करणे किंवा फोनद्वारे सहकार्य करणे आपल्या इष्टमित्रांना योग्य तो सल्ला देणे मदतीचा हात देणे एकदम समाजातून दूर वाळीत टाकले हे योग्य नव्हे त्यांची किमान भीती दूर करून त्यांना धीर देणे गरजेचे आहे हे काम आपण एक जबाबदारी म्हणून स्वतःपासून सुरू केली पाहिजे या भयानक रोगाला हरवण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गर्दी न करणे त्यांनी सैनीटाइजर वेळोवेळी वापर करणे मास्क वापरणे खोकताना किंवा शिंकताना रुमाल लावणे ही खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे खबरदारी घेणे हीच आपली जबाबदारी आहे एकमेकांच्या सहवासात जास्त न राहता फक्त संपर्कात राहणे 2020 हे वर्ष कोरोना महामारिच्यादृष्टीने ऐतिहासिक वर्ष मानावे लागेल या वर्षाने मानवा सोबत एक अद्भूत भयंकर इतिहास रचला आहे आणि या इतिहासाची नोंद भविष्यात सर्व पाठ्यपुस्तकात घेण्यात येईल यापासून खबरदारी व उपायांची माहिती भविष्यातील विद्यार्थ्यांना समाजाला कळेल तुर्त तरी आपण सावध व सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करूया.

आपण आपले कुटुंब आपली जबाबदारी सांभाळू या आणि आनंदाने जगू या दुसऱ्याला जगवूया या . . . !

धन्यवाद।

Related posts