Blog

स्वागत नववर्षाचे; दोन हजार एके विसाचे – – –

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
=================================================================================

खरंतर माणसे जोडणे मला खूप खूप आवडते माणसाने माणसावर प्रेम करावं त्याचे सुख-दुःख विचारावे जमेल तर मदत करावी नसेल तर धीर द्यावा आधार द्यावा प्रेमाने माणूस जोडला जातो माणूसच काय पण पशुपक्षी प्राणी सुद्धा आपले मित्र बनतात व आपल्या सोबत राहतात एक एक फूल जोडून जसा हार बनवावा फुलांचा हार बनवावा तसा एक माणूस सुंदर विचाराने एकत्र यावा तो जोडावा व सुंदर विचारांची सकारात्मक ऊर्जा त्मक विचारांच्या माणसांची एक माळ बनवावी जसे ज्योत से ज्योत मिलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो दिव्याने दिवा लावायचा असतो तसं माणसानेच माणूस जोडायचा असतो तो दूर करायचा नसतो

पण यावर्षी कोरोनाच्या या संकटामुळे सर्व माणसेही तोडली गेली एकमेकापासून दूर विखुरली गेली माणसांची ही माळ विसरून गेली आपण सर्वजण सुद्धा या माणुसकीच्या विचारांच्या माळेतील एक सुंदर फूल आहात माझ्यासाठी तर अनमोल आहातच चला आपण सगळे मिळून या नवीन वर्षाचे स्वागत करूया माणसाला माणूस जोडुया विचाराला विचार जोडुया चांगल्या विचारांचे आदान-प्रदान करूया झाले ते सगळे विसरुन जाऊ या नवीन वर्षात नव्याने सुरुवात करूया नवीन वर्षाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना मन भरून गोड गोड शुभेच्छा नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदी सुखी समाधानी व निरोगी जावे आपणा सर्वांची भरभरून प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने आपल्या मनात काहीतरी चांगला संकल्प केलाच पाहिजे फक्त संकल्प करून चालणार नाही तो शेवटपर्यंत टिकवला पाहिजे व पूर्ण केला पाहिजे काही जण म्हणतात की काय संकल्प करावा आम्हाला काही कळतच नाही तेव्हा सरळ-सरळ आपण आपल्या आरोग्य पासूनच सुरुवात करुया पाहुया प्रयत्न करूया की की हे संकल्प आपल्याला जमतात का पहाटे उठून फिरायला जावे योग्य व झेपेल तो व्यायाम करावा झोप व्यवस्थित पूर्ण व वेळेवर घ्यावी आहार विहार योग्य व संतुलित ठेवावा विनाकारण कोणाच्या भानगडीत पडू नये कारण नसताना एखाद्याच्या मध्ये पडू नये व स्वतःला त्रास करून घेऊ नये नको त्या संबंध नसलेल्या गोष्टीचा ताण स्वतःवर घेऊ नये उदाहरणार्थ निवडून कोण येईल सरपंच कोण होईल याला कोणते खाते मिळेल त्याला कोणते खाते मिळेल…

जीवनात प्रामाणिकपणा ठेवावा कोणाला फसवू नये कोणावर अन्याय करू नये नवीन ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा व जमेल तेवढे स्वतःला अपडेट ठेवावे व दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करावा कुणाचाही दुःखाचे व त्रासाचे कारण बनू नये कुठलेही ही वाईट व्यसन आरोग्यास समाजात घातक असे व्यसन करू नये आपल्या कर्तव्याशी नोकरी व कामाशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहावे किमान दोन तरी झाडे लावावीत व त्यांना मनापासून सांभाळावे जपावे मित्रांनो या गोष्टी तशा अवघड नाहीत पण मानल्या तर तशा सोप्या हि नाहीत आपण स्वतः ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचे आहे चला तर मग या नवीन वर्षात आपण आणखी आनंदी उत्साही पणाने जीवन जगूया व दुसऱ्याला जगु द्या

नवीन वर्षात नवीन मैत्रीचे स्नेहाचे ऋणानुबंध जपूया स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जोडलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात आपल्याला असे आयुष्यभर सोबत देणारी माणसे जोडायची आहेत येणाऱ्या या नवीन वर्षात असेच नवीन संकल्प करून आपले आयुष्या आनंदित करूया आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना स्नेह वंदन आपलाच स्नेही

Related posts