26.3 C
Solapur
September 29, 2023
अक्कलकोट

अक्कलकोट येथे युवक काँग्रेसच्यावतीने नूतन आमदार आसगावकराचां सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांनी अक्कलकोट युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा घरी सदिच्छा भेट दिली या निमित्ताने त्यांचा सत्कार अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेस वतीने करण्यात आले.

या प्रसंगी आमदार आसगावकर यांनी निवडणुकीत प्रचार आणि सहकार्य केले त्या बद्दल माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व युवक काँग्रेसचे आभार मानले.युवक काँग्रेसला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी के.एस.लाळसंगी, वासिम कुरेशी, रवी बिराजदार, विष्णु येलमेली, बालाजी शापवाले, आकाश निंगदली, हमीद गिलकी, महादेव करमल, मुबारक कोरबु, आनंद मासुती, बाळा वाघमोडे, मुद्दसर शेख, गुंडू पाटील, वासिम बागवान, रामचंद्र समाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts