सचिन झाडे
पंढरपूर :
साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी देखील ऊसदराची कोंडी अद्याप फुटली नाही. शिवाय पहिली उचल अडीच हजारांची मागणी असताना ती कमी दिल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून आंदोलन करण्यात आली. उस वाहतूक करणारे वाहने देखील अडणविण्यात आल्याने रास्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक खोळांबली आहे.उस दराच्या प्रश्नांवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतीली असून जो पर्यंतची उसाची संपूर्ण एफआरपी, उस दराची पहिली उचल २५०० रुपये जाहीर होत नाही, तोपर्यंत अांदोलने सुरु राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी सांगितले.
उस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर तालुक्यातील ऊस क्षेत्र असणार्या भागातील गांवागांत जाऊन शेतकर्यांच्या गाठीभेटी घेऊन बैठकीचे दौरा सुरू करण्यात आले आहे.या बैठकांमध्ये कारखानदार शेतकर्यांच्या उसाला पहिली उचल २५०० रुपये दर जाहीर करत नाही तोपर्यंत शेतकर्यांनी आपल्या उस कारखान्याला देऊन नये.तसेच उसाला २५०० रुपये पहिली उचल मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटणार नाही.अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.आज पटवर्धन कुरोली,शेवते ,भोसे यांठिकाणी बैठकी घेण्यात आल्या.
इतर ठिकाणी उसाला चांगला दर मिळत असताना राज्यात सर्वाधिक जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे ऊसदरासाठी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र साखर कारखानदारांनी एकी करून शेतकऱ्यांच्या माथी कमी दर देण्याचा सपाटा लावला आहे. अगदी तसाच प्रकार या वर्षी सुरू केला. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष धुमसत असताना अखेर ऊसदराचे हे आंदोलन स्वाभिमानीने सुरू केले आहे.त्यामुळे ऊसदराचे हे आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. त्यांच्या कष्टाला योग्य दर देण्याच्या दृष्टीने पहिली उचल 2500 द्यावी.शेतकरी संघटना प्रत्येक गावांगावांत बैठका घेऊन शेतरकर्यांमध्ये उस दराबाबत जनजागृती करुन त्यांना विनंती करणार आहे.जो पर्यंत आपल्या उसाला पहिली २५०० रुपये मिळत नाही.तो पर्यंत उसाला कोयताही लावू देऊ नका,जो पर्यंत हा दर मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणार असून याची शासनांकडून या मागणीची तात्काळ दखल घ्यावी,अन्यथा होणाऱ्या नुकसानास शासन जाबाबदार राहील असा इशाराही यावेळी दिला.
— तानाजी बागल
(जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना )
जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना उसदाराच्या प्रश्नावर आक्रमक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना उस दाराच्या संदर्भात एकत्रित येत उसाची पहिली उचल २५०० रूपये जाहीर कारावी यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले जिल्हाधिकारी.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना,बळीराजा शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यांची बैठक घेऊन तात्काळ सकारात्मक तोडगा काढावा.तसेच उसाची पहिली उचल पंचवीसशे रुपये देण्यात यावी.अन्यथा सर्व शेतकरि संघटना मिळून तीव्र आंदोलन करु असा इशार्याचे निवेदन यावेळी दिला.
यावेळी संघटनांचे प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे,रयत क्रांती संघटनेचे दिपक भोसले,बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हाळणवर,प्रहार संघटनेचे दत्तात्रय मस्के,आदिं सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.