पंढरपूर

विजपुरवठा पूर्ववत करा,अन्यथा महावितरणवर सोमवारी दंडुके घेवुन येवु.. – तानाजीराव बागल

पंढरपूर (प्रतिनिधी) गणेश महामुनी

महावितरण कडुन पंढरपूर तालुका व परिसरातील शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे,महावितरणने याबाबत शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही, वीजपुरवठा खंडीत केल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतातील पिके वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे आहे.
महावितरणने अचानक हे विजतोडणीचे धोरण अवलंबल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहे.. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके करपु लागल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंढरपुर येथील महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गवळी यांना निवेदन देण्यात आले..
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांच्या नेतृत्वात श्री.गवळी यांची भेट घेतली व आपले म्हणणे मांडले..
चौकट – शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात महावितरण ने सांभाळुन घेणे गरजेचे असताना महावितरणकडुन मात्र शेतकर्यांना वेठीस धरले जात आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी असुन महावितरणने जर सोमवार दि.29 पर्यंत शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत नाही केला तर आता भगतसिंगांच्या मार्गाने दंडुका मोर्चा घेवुन येवू. आणि महावितरणला निर्णय घेण्यास भाग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी दिला आहे..
यावेळी त्यांच्यासह युवाआघाडी राज्यप्रवक्ता रणजित बागल, जिल्हासंघटक शाहजहान शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे,ता.उपाध्यक्ष नामदेव कोरके,मनोज गावंधरे,गणेशदादा फाटे,यशवंत बागल, कांतिलाल नाईकनवरे,स्वागत फाटे,संतोष बागल,अतुल गायकवाड,संतोष पोरे,शंकर नागटिळक,संतोष नागटिळक,दिपक बिरादार,संजय चव्हाण यांसह इतर पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते..

Related posts