तुळजापूर

भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेज शासनाला हस्तांतरित करणे बाबत मा. खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांना प्रस्ताव सादर.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

काल दि. 23 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, तुळजापूर हे महाविद्यालय, महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करणेबाबत आज भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास (दादा) पाटील यांना या संदर्भात प्रस्ताव देण्यात आला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेजच्या शासनाला हस्तांतरित करणे बाबत भारतीय विद्यार्थी सेना व कॉलेज च्या शिष्टमंडळाने मा. खा. ओमराजे निंबाळकर तसेच आ. कैलासदादा पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांची सविस्तरपणे चर्चा झाली. यामध्ये शिष्टमंडळाने व उपस्थित भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रस्ताव सादर करत, पुढील बाबी मा. आमदार व खासदार यांना सविस्तरपणे सांगितल्या.

यामध्ये, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय हे नॅक द्वारा बी श्रेणी मिळालेले महाविद्यालय असून महाविद्यालयाचा एकूण क्षेत्रफळ 17.22एकर असून महाविद्यालयात प्रशासकीय भवन ग्रंथालय तसेच सर्व विभागांसाठी स्वतंत्र इमारती आहेत .प्रत्येक विभागात नवीन उपकरणे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध असून एक स्वतंत्र कार्यशाळा महाविद्यालयांमध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी मुलांसाठी दोन स्वतंत्र वसतिगृह तसेच मुलींसाठी दोन स्वतंत्र वसतिगृह याची व्यवस्था केलेली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी सदरील महाविद्यालय शासनात हस्तांतरीत करण्यासाठी महाविद्यालयातील चल अचल संपत्ती तसेच कर्मचारी यांचे विनामोबदला हस्तांतरणाचा ठराव आपल्या बैठकीत घेतलेला आहे. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय झाल्यास जिल्ह्यासोबतच मराठवाड्याला हि आपल्या हक्काच्या 70 टक्के कोट्या मधील जागा मिळतील तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना एका शासकीय महाविद्यालयात शिकण्याची ची संधी उपलब्ध होईल.

भेटीनंतर खासदारांनी महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाला हस्तंतरण यासंबंधी सर्वतोपरी मदत तसेच शासनासोबत याबाबतचा पाठपुरावा करू असे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी, शिष्टमंडळात प्रा. विवेक गंगणे, डाॅ. धनंजय खुमने, प्रा. पानसरे,प्रा. सचिन काळे, प्रा. एकदंते यांच्यासोबत भारतीय विद्यार्थीसेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, आबा कापसे, प्रशांत अपराध, विशाल जाधव उपस्थित होते.

Related posts