33.9 C
Solapur
February 21, 2024
अक्कलकोट

अक्कलकोट येथील एमएसईबी कार्यालय जवळ भारतीय जनता पार्टीच्यावतीने वाढीव वीजबिलाची होळी करून शासनाचा निषेध.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
अक्कलकोट येथील एमएसईबी कार्यालय जवळ भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिलाची होळी करून शासनाचा निषेध करण्यात आला.

लॉकडाऊन काळामध्ये राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले आहे अशा परिस्थितीत भरमसाठ वाढीव बिल जनतेला आले आहे हे कमी करावे, हि मागणी मान्य नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी दिला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन , दुधनीचे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे ,नगरसेवक महेश हिंडोळे आदी नी मनोगत व्यक्त केले .

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, भिमाशंकर इंगळे, चंद्रकांत इंगळे, जयशेखर पाटील, राजशेखर मसुती, शिवशरण वाले, यशवंत धोंगडे, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर यादवाड, महेश हिडोंळे, दयानंद बिडवे, रमेश कापसे, सौ. सुरेखा होळीखट्टी, बाळा शिंदे, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, दयानंद बमनळी, प्रदिप पाटील, लक्ष्मण बुरुड, धोंडीप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, सैपन मुजावर, सुधीर मचाले, अविनाश पोतदार, छोटू पवार, विनोद मोरे, अंबण्णा कामनूरकर, अंबण्णा चौगुले, सोन्या बापू शिंदे, गेनसिध्द पाटील, इरण्णा भरमशेट्टी, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, मोहसनि मुल्ला, विठ्ठल कत्ते, ऋषि लोणारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts