पंढरपूर

स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा.

सचिन झाडे
पंढरपूरः-

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे उपस्थित होते.

प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आपले विचार मांडताना श्री. विरधे म्हणाले की ,‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजासाठी फार मोलाचे कार्य केलेले आहे. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आपल्या समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केलेले आहे. आपण सर्वजण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो.’ असे सांगून त्यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, इक्विटास बँक पंढरपुरचे ब्रँच मॅनेजर प्रमोद निचल, स्पोकन इंग्लिश अकादमीच्या प्रोप्रायटर लीना निचल, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts