जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
शिवसेना नेते युवा सेना प्रमुख,मा नामदार आदित्यजी ठाकरे साहेब* यांच्या आदेशानुसार कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे राज्यामध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन 6 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले यानिमित्ताने युवासेना कळंब वतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले युवकांनी या सामाजिक कार्यात युवक ,युवती यांनी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला
युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या आव्हाना ला प्रतिसाद देत भव्य रक्त दान शिबीर घेण्यात आले. या वेळी शिबिराचे उदघाटन मा श्री ह भ प प्ररमेश्वर महाराज बोधले यांनी स्वतः रक्तदान करून केले. सहा डिसेंबर या रोजी मा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या स्मृती दीना निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रम ला सुरवात केली. या वेळी ज्येष्ट नागरिक बबन नाना जावळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे , युवासेना राज्य विस्तारक तथा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन लांडगे ,शिवसेना शहरप्रमुख प्रदीप मेटे, नगरसेवक सतीश टोणगे, सुरेश शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, युवासेना विधानसभा प्रमुख सचीन काळे, युवासेना तालुका प्रमुख मनोहर धोंगडे ,युवासेना उपतालुक प्रमुख उमेश जाधव, सचिन पाटील व शहर प्रमुख गोविंद चौधरी, संजय घुले , दिनकर काळे, विजय पारवे, ऋषिकेश गडकर अजित ,घोगरे अमोल, शिंगटे विपुल सावंत व इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व शिवसेनीक व युवासेनिक यांनी नी रक्तदान शिबीर ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ..