आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात एक मोठा ट्विस्ट झाला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे के. पी. गोसावीच्या बॉडीगार्डने दिलेला जबाब. त्याने आपल्या जबाबात हा धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आत्तापर्यंत चारवेळा त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला मात्र तो फेटाळण्यात आला आहे.
एकीकडे आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. तर के.पी. गोसावी हे पंच असून आता समोर का येत नाहीत असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. तसंच या पंचांबाबत त्यांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत. असं सगळं असतानाच के. पी. गोसावीच्या बॉडिगार्डने धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हटलं आहे के. पी. गोसावी यांच्या बॉडीगार्डने?
किरण गोसावी हे या प्रकरणात फरार आहेत. मात्र त्यांचा बॉडीगार्ड प्रभाकर याने आज तक सोबत एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आहे. यामध्ये प्रभाकर याने एका नोटरीकृत प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला आहे. कोऱ्या प्रतिज्ञापत्रावर माझ्या सह्या घेण्यात आल्या असं प्रभाकरने म्हटलं आहे. प्रभाकर हा देखील या प्रकरणात साक्षीदार आहे. त्याला साक्षीदार क्रमांक एक असं म्हटलं आहे. आपल्याला तिथे काय होणार आहे हे कळलं नव्हतं. पंचनाम्याचे कागद आहेत असं सांगून माझ्या सह्या घेण्यात आल्या आहेत असं प्रभाकरने सांगितलं आहे.
समीर वानखेडेपासून जिवाचा धोका?
या प्रकरणातील पंच के. पी. गोसावी यांना समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही दावा प्रभाकर याने केला आहे. क्रूझवर छापा करण्याच्यावेळी मी आणि गोसावीसर सोबत होतो. समीर वानखेडे तिथे बसलेले होते. मी त्यांना फ्रँकी आणि पाण्याची बाटली दिली. मला के. पी. गोसावी यांनी असं सांगितलं थोडावेळा बाहेर जा मी तुला व्हॉट्स अप काही फोटो पाठवतो. त्या फोटोतल्या लोकांना ओळख असं सांगितलं. मला ते फोटो लगेच आले नाहीत. साधारण दीड वाजण्याच्या सुमारास आले. त्यातला पहिला फोटो हा मुनमुन धमेचाचा होता. के.पी. गोसावी त्या दिवसापासून मला भेटलेले नाहीत. त्यांना समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे.
मी 22 जुलै 2021 पासून किरण गोसावी यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होतो. मात्र जेव्हापासून छापा मारला गेला आणि हे सगळं प्रकरण समोर आलं तेव्हापासून मी गोसावी यांना भेटलेलो नाही ते कुठे आहेत ते मला माहित नाही असंही प्रभाकरने सांगितलं आहे.
प्रभाकरच्या फोनमध्ये आहेत फोटो आणि व्हीडिओ
प्रभाकरने जेव्हा क्रूझवर छापा पडला तेव्हाचा व्हीडिओ त्याच्या फोनमध्ये शूट केला आहे. तर काही फोटोही घेतला आहे. यातल्या एका फोटोमध्ये के. पी. गोसावी त्याचा फोन घेऊन उभा आहे आणि तो फोन स्पीकर मोडवर असून तो आर्यनची कुणाशी तरी बोलणं करून देतो आहे असं दिसतं आहे.
प्रभाकरने केलेल्या या दाव्यांनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एनसीबीने असं म्हटलं आहे की के.पी. गोसावी हे स्वतंत्र पंच आहेत मग त्यांना क्रूझवरच्या छाप्या दरम्यान आणि अटकेदरम्यान तिथे कसं काय जाता आलं?
गोसावीच्या फोनवर आर्यन खानने कुणाशी चर्चा केली? आणि ही चर्चा नेमकी काय होती?
सॅम कोण आहे?
हे प्रश्न समोर आले आहेत.