तुळजापूर

निराधार अंध दांपत्याला  धाराशिवचे कर्तव्यदक्ष खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर यांचा मदतीचा हात

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
निराधार अंध दांपत्याला  धाराशिवचे कर्तव्यदक्ष खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर यांचा मदतीचा हात

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक व वित्त हानी झालेली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फटका लोकांना बसला आहे. देवसिंगा तूळ, ता. तुळजापूर येथे अर्जुन शिवाजी मस्के व त्याच्या पत्नी हे एक निराधार अंध दाम्पत्य राहत होते. या अतिवृष्टीमध्ये या दाम्पत्याचे घर हे वाहून गेले होते. अशा निराधार दाम्पत्यावर असे संकट कोसळले असता, धारशिवचे खा. मा. ओमराजे निंबाळकर यांनी अतिवृष्टी पाहणी दौर्यावर असताना या कुटुंबियांची भेट घेऊन त्याला आधार दिला होता. यामध्ये त्यांना लवकरात लवकर मदतीचे आश्वासन मा. ओमराजे निंबाळकर यांनी दिले होते.

आज रोजी धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या “२०%राजकारण व ८०% समाजकारण” तत्वांप्रमाणे त्या निराधार दाम्पत्याला धाराशिव शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांच्या हस्ते रोख 20,000 रुपये आर्थिक मदत करून मदतीचा एक छोटासा आधार देण्यात आला. प्रसंगी अर्जुन मस्के यांच्या वतीने मा. खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेनेचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. मा. खासदार साहेबांच्या अशा धडक कृतीचे सर्व जनतेत कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी धाराशिव तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी,तुळजापूर उपतालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,धाराशिव विभागप्रमुख सौदागर जगताप सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,अमिर शेख,सिदफळ सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्राम कारभारी,काक्रंबा सोशल मिडीया विभागप्रमुख महादेव पवार यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related posts