जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असुन उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असली तरी प्रशासनाने स्वछ तेचे आवाहन केले आहे, परंतु कळंब नगरपालिका ला याचा विसर पडलेला दिसतोय
कळंब शहरातील चोंदे गल्लीतील कचऱ्याचे ढीग जागोजागी पाहायला मिळत आहेत..नाल्याची साफ सफाई होत नाही,त्या मुळे डास बसू देत नाहीत.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत आहे. शहरात फॉगींग मशीनद्वारे फवारणी बंद आहे. तसेच रस्ते व नाली सफाई वेळेमध्ये होत नसल्याने घाण रस्त्यावर जमा होत आहे. त्याचा परिणाम असा झाला की साथीचे आजार वाढले. शहराचे मुख्य रस्ते साफ करायचे व अंतर्गत रस्त्याकडे पाहायचे नाही हा दुटप्पा येथील कंत्राटदारांच्या कामातून दिसुन येत असल्याचा आरोप होत आहे.
अनेक शासकिय व नागरी वसाहतीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्थानिक नगरसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. शहराच्या अनेक भागात नागरिकांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. त्यांना पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागतो. नको तिथे खर्च करुन नगरपालिका आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. असे असताना कळंबच्या नगरपालिकेला जाग कधी येणार हा मोठा प्रश्न आहे!!!!!???
आमच्या चोंदे गल्लीतील नाली आहे, जी कित्येक महिन्यापासून साफ-सफाई (स्वच्छ) केलेली नाही. यामुळे संपूर्ण भागात प्रचंड घाणी चे साम्राज्य निर्माण झाले असून नाल्या तुंबल्या आहेत. तसेच मच्छरांचा प्रमाण भयंकर वाढले असल्याने मच्छर सुद्धा प्रौढावस्थेत (मोठे-जाड) आलेले आहेत. कृपया आम्ही कोरोना (Covide-19) मरण्यापेक्षा मच्छर चाऊन मुरुन जाऊ… अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कृपया नागरिकांची काळजी घ्यावी.
– संतोष शिंदे
नागरिक