साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील ग्रामस्थांकडून रेशन दुकानदाराच्या अन्याय व रेशन वाटपामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविरूध्द रेशन दुकानावर बहिष्कार टाकल्याबाबत मा.जिल्हाधिकारी, मा.जिल्हा पुरवठा अधिकारी व मा.तहसिलदार, तुळजापर यांना लेखी निवेदन माजी सैनिक शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी दिले आहे.
पिंपळा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार श्रीमती एस.आर.मस्के यांच्याकडून गावकर्यावर झालेल्या अन्याय किंवा गावकर्यांच्या रेशन वाटपामध्ये केलेल्या व सिध्द झालेल्या भ्रष्टाचारास विरोध दर्शविण्यासाठी समस्थ ग्रामस्थाद्वारे रेशन दुकानावर बहिष्कार टाकण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे.येथील ग्रामस्थांनी यापुर्वीही सदर दुकानदाराचे लायसन रद्द करण्याची मागणी केलेली असतांनाही ते रद्द न करता उलट त्याच भ्रष्ट दुकानदारास परत स्वस्त वितरक करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण ग्रामस्थ पिंपळा खुर्द यांनी बहिष्कार टाकला आहे. कोरोना काळात लोकांना स्वस्त धान्यापासून वंचित न ठेवता शेजारील गावातील रेशन दुकानातून धान्य वाटपाची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी या निवदनाद्वारे माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी केली आहे.