Blog

शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतून की इंग्रजी भाषेतून —-?

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर., जिल्हा उस्मानाबाद.

ही माय भूमी ही जन्मभूमी मी ही कर्मभूमी मी ही आमची महा वंदनीय अतिप्राणप्रिय हि माय मराठी आमुची हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली हि माय मराठी आमुची आपण ज्या मातीत जन्मलो ज्या मातीत वाढला लोळलो खेळलो बागडलो ज्या मातीत लहानाचे मोठे झालो ती माती मातृभूमी मातृभाषा आपल्यासाठी स्वर्गाहून श्रेष्ठ असते बालपणी अ आ आई इ बोबडे बोल सर्वप्रथम ज्या भाषेत उच्चारला आहे हे ती सर्वश्रेष्ठ भाषा असते ती भाषा म्हणजे मातृभाषा होय तिलाच बोलीभाषा मायबोली जन्म भाषा जननी भाषा किंवा मातृभाषा असे म्हणतात आपण जीवनातल्या प्रत्येक कार्याची सुरुवात मातृभाषेतूनच करतो म्हणून माझे स्पष्ट मत आहे की शिक्षणाचे माध्यम हे हे मातृभाषेतूनच असावे भारत हा विविध जाती धर्म संप्रदाय परंपरा व विविध भाषांचा देश आहे भाषा ही मानवाच्या विकासातील सर्वात महत्त्वाचे अंग आहे आपल्या देशात प्रत्येक राज्याची ची भाषा वेगळी आहे आपली राष्ट्रभाषा ही हिंदी आहे हे परंतु इंग्रजी ही परकीय भाषा आहे आपल्याला इतिहास सांगतो आहे ये कि इंग्रजीने आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले आहे इंग्रजी ही आधुनिक भाषा , साम्राज्यवादाची ची व हुकूमशाही ची भाषा आहे इंग्रजी भाषेने आपल्या भाषेवर हुकुमत गाजवायला सुरुवात केली आहे माझे स्पष्ट मत आहे की आपल्या शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतूनच असले पाहिजे मातृभाषेची शक्ती प्रेरणा आत्मविश्वास प्रेम व जिव्हाळा हा लहानपणापासूनच मिळालेला असतो त्या भाषेतूनच जगाचे प्राथमिक ज्ञान आपल्याला मिळते स्वत्वाची जाणीव मातृभाषे मुळे होते मातृभाषा आहे हृदयातून उमलणारी भाषा असते.

कुठलाही प्रसंग घ्या अत्यंत आनंदाचा दुःखाचा र्ष उल्हास आश्‍चर्य ग्रहणा असे भाव प्रथम आपण आपल्या मातृभाषेतूनच व्यक्त करतो शिक्षणाचे माध्यम इंग्रजी का असावे असा प्रश्न आपल्याला पडतो मला वाटते की इंग्रजी ही खूप दूरची पाहुणे आहे आणि आपल्याकडे ती वास्तव्याला आलेली आहे आजच्या जागतिकीकरणात संगणक संगणक इंटरनेटच्या युगात इंग्रजी भाषा ही प्रभाव पूर्ण वज्ञान भाषा वाटते पण इंग्रजी ही ज्ञानाची खिडकी असेल तर आपली मातृभाषा त्या ज्ञानाचे मुख्य द्वार आहे प्राचीन काळातील मातृभाषेतील मोठ-मोठ्या ग्रंथांच्या आधारे रामायण-महाभारत ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका भगवत गीता संत तुकाराम गाथा अधिक ग्रंथातून मातृभाषेची महती आपल्याला कळते शिक्षणाचे माध्यम त्या विद्यार्थ्यांची मातृभाषा असणे आवश्यक व बंधनकारक वाटते मातृभाषेतून आपले विचार कल्पना संशोधन भाषण लेखन संभाषण चर्चासत्र अभ्यास चिंतन स्पष्टीकरण अगदी सहजपणे मांडता येते.

इंग्रजी भाषा ही पोपटपंची भाषा आहे ज्याप्रमाणे भविष्यकार पोपटाला भविष्य शिकवतात बोलायला शिकवतात अगदी त्याप्रमाणेच पाठांतर किंवा घोकंपट्टी घोका आणि ओका ही पद्धत इंग्रजी भाषेचे आहे. गाणे डान्सिंग डान्सिंग फॅशनेबल वेगवेगळे क्लास हॉटेल्स विविध जाहिराती आपल्या संस्कृतीला अशोभनीय असे वर्तन पुढे आले आणि आज इंग्रजीची हुकुमशाही पुन्हा भारतात सुरू झाली आपण इंग्रजी भाषेच्या इतके आधीन गेलो की की आपल्या मातृभूमीला मातृभाषेला विसरून जात आहोत आज आपलीच मुले ही इंग्रजी ची शाळेतील शिकत आहेत इंग्रजीही ही ज्ञान भाषा नसून ती अहंकाराची भाषा आहे शिक्षणाचे माध्यम जर अशा हुकुमशाही वृत्तीच्या भाषेतून असेल तर आधुनिक विद्यार्थ्यांच्या अहंकाराला खळखळाट सुरू होईल आपले गाव आपले शहर आपली शाळा आपली मातृभूमी संस्कृती व मातृभाषा यांचा विसर पडेल त्यांचा भौतिक व बौद्धिक विकास होईल पण त्यांचा भावनिक नैतिक मूल्यांचा ऱ्हास होईल जे शिक्षण आपल्या मातृभाषेचा विसर पाडते अशा भाषेतील शिक्षण काय कामाचे?

पण काही विद्वानांना मातृभाषेतून शिक्षण हे कमीपणाचे वाटते इंग्रजी बोलता येणे कळता येणे लिहिता-वाचता येणे इंग्रजी व्यवहार करणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या अशा शिक्षणामुळे जर आपल्या मूळ संस्कृती वरच संकट येत असेल तर आशा भाषेतील शिक्षण काय कामाचे पूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या आपले आजी आजोबा पंजोबा काही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेले नव्हते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ समर्थ रामदास संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांनी कुठले शिक्षण घेतले होते. भारतातील कुठलाही महान ग्रंथ हा मातृभाषेतूनच लिहिला गेला आहे रामायण महाभारत ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुकाराम गाथा इत्यादी सतत दीडशे वर्ष जिच्या जोखडाखाली आपण जगलो हुकूमशाही वाढलो तीच भाषा आज आपल्याला चिकटून बसली आहे व आपण पूर्ण पहा तिच्या आहारी गेलो आहोत.

विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत शिक्षण देणे म्हणजे त्यांची दिशाभूल करून मातृभाषेपासून अलिप्त करणे होय आज आधुनिक काळातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची दशा अत्यंत दयनीय स्वरूपाची झाली आहे इधर ना उधर बीच मे आदर अशी अवस्था दिसून येते शेवटी ते मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात अक्षरशहा कुठल्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही भारतीय संस्कृती भारतीय विचार भारतीय धर्म भाव भावना दूषित प्रदूषित करण्याचे काम इंग्रजी माध्यमाने केली आहे शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतूनच असले पाहिजे फक्त शाळाच नव्हे तर देश राज्याचा कारभार हा सुद्धा मातृभाषेतूनच झाला पाहिजे तरच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास सर्वांगीण विकास जनतेचा विकास युवकांचा विकास पर्यायाने देशाचा विकास होईल त्या-त्या राज्यांच्या मातृभाषेतूनच त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे आजच्या 9 तरुण पिढीला काय हव आहे ते कसं मिळवता आलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे परखे भाषेला तेवढा अवास्तव दर्जा देणे कितपत योग्य आहे लहान बालकाला कुठलीही कला कुठलीही गोष्ट कुठलही काव्य कुठलाही खेळ किंवा कुठलीही चर्चा संवाद नाटक प्रकल्प उपक्रम हे मातृभाषेतूनच प्रथम समजतात मातृभाषा ही त्याची मायबोली असते जननी असते प्रेम माया नम्रता देणारी असते मातृभाषा मुलाला परिपक्व बनवते जसे एखादा वृक्ष आपल्या पानाफुला फळांना परिपक्व बनवतो त्यामध्ये रस निर्माण करतो त्याला स्वादिष्ट अशी चव निर्माण करतो अगदी तसेच मातृभाषा मुलाला फुलवीत असते मातृभाषा नसेल तर विद्यार्थी पोरका होतो दुबळा बनतो अविश्वासाने खचून जातो स्वावलंबी बनत नाही परावलंबी बनतो एखाद्या वेलीसारखी त्याचे जीवन बनते विद्यार्थी लहानपणीची आठवण शाळा गुरुजी त्यांची भाषा त्या परिसरातील मायबोली कधीच विसरू शकत नाही म्हणून राहून राहून वाटते की शिक्षणाचे माध्यम हे त्या-त्या मातृभाषेतूनच असले पाहिजे.

धन्यवाद…!

Related posts