26.3 C
Solapur
September 29, 2023
उस्मानाबाद 

स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण

साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर तालुका प्रतिनिधी.
पिंपरी, ता.उस्मानाबाद (धाराशिव) येथे आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत हनुमान मंदिर समोर सभामंडप व गाव अंतर्गत जनसुविधा अंतर्गत योगेश गरड ते दत्ता गरड यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन माझ्या व आ.कैलास घाडगे-पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सुर्डी ता. उस्मानाबाद (धाराशिव) येथे आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत संत धोंडिबुवा महाराज यांच्या मंदिराजवळ सभामंडपाचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर व आ.कैलास घाडगे-पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, माजी पं.स. सभापती श्याम जाधव, पं.स.सदस्य गजेंद्र जाधव, योगेश गरड, भैरवनाथ गरड, विशाल गरड, मोहन बेलदार, लक्ष्मण गांधले, बंडू बेलदार, चंद्रकांत गांधले, हरिश्चंद्र माळी, वडगाव सि. चे सरपंच अंकुश मोरे, उपतालुका प्रमुख अण्णासाहेब पवार, विभागप्रमुख सौदागर जगताप, जुनोनी माजी सरपंच अमोल मुळे आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts