तुळजापूर

रोहित दादा पवार युवा मंच तालुकाध्यक्ष पदी श्रीधर नरवडे यांची निवड

प्रतिनिधी / तुळजापूर
पुरूषोत्तम विष्णु बेले

रोहित दादा पवार युवा मंच तालुकाध्यक्ष पदी श्रीधर नरवडे यांची निवड
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचार घेऊन त्यांच्या विचारांची पताका अखंड महाराष्ट्र भर पेरण्यासाठी आमदार रोहित दादा पवार मार्गदर्शनाखाली सामन्य जनतेच्या सेवेसाठी रोहित दादा पवार युवा मंच तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी खुदावाडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीधर देवीदास नरवडे यांची निवड करण्यात आली.
ची निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जगताप यांनी करून त्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते धनेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील, रोहित दादा पवार युवा मंच चे जिल्हाध्यक्ष अशोक जगताप, गणेश ननवरे, निरंजन पाटील, चंद्रशेखर बोंगरगे, सांगावे शिवाजी, जयंत पवार, राज पवार आदि जण उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts