उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी.
भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 02 नोव्हेंबर 2020 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असून निवडणूकीचा कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे.
अधिसूचना जाहीर करणे दि. 5 नोव्हेंबर,2020 (गुरुवार), नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 12 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार),नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 नोव्हेंबर, 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 01 डिसेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाची वेळ सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत. मतमोजणी दिनांक 03 डिसेंबर, 2020 (गुरुवार), निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिनांक 07 डिसेंबर, 2020 (सोमवार)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात आदर्श आचारसंहिता तात्काळ परिणामाने लागू झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा 05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.