शिवसैनिकांमार्फत जिल्हाभरात राबविण्यात आले विविध सामाजिक उपक्रम.
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव विधानसभेचे आमदार मा. श्री. कैलास पाटील यांचा वाढदिवस फाजील खर्चाला फाटा देत, धाराशिव जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
आ. कैलासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव तालुक्यातील घाटंग्री तसेच जुनोनी या गावांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. चिलवडी येथील सहारा वृद्धाश्रम येथे किराणा साहित्य वाटप केले तसेच विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. गावसुद गावामध्ये शेतरस्त्याच्या कामाचा शुभारंभ या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा ग्रामपंचायत सफाई कर्मचारी महिलांना साडी चोळी, वृक्षारोपण, अपंगांना सायकल वाटप, लोकांना मास्क वाटप, तसेच हॉटेल व्यावसायिकांना डस्टबीन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. धाराशिव शहरातील अन्नपूर्णा या ठिकाणी लोकांना अन्नदान व अन्नपूर्णा टीमचा सत्कार करण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील करजखेडा या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पाटोदा या ठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान चालू करण्यात आले. भंडारी या गावांमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शिवसेना शाखा भंडारी यातील नवीन बोर्ड चे अनावरण करण्यात आले. तोरंबा या ठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला व विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.
धाराशिव शहरातील स्त्री रुग्णालय या ठिकाणी नवजात बालकांना व मातांना साडीचोळी बाळाला ड्रेस व रुग्णालयातील असणारे सिस्टर यांना किट वाटप करण्यात आली तेर या ठिकाणी फळ वाटप व शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला अशा विविध उपक्रमाने श्री आमदार कैलास पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन बाप्पा शेरखाने, विभाग प्रमुख सौदागर जगताप, प्रभाकर मुकेश पाटील, विभाग प्रमुख आबा सरडे, माजी सरपंच जुनोनी अमोल बप्पा मुळे, गण प्रमुख पोपट खरात, आपसिंगा ग्रा.पं. सदस्य अमीरभाई शेख, बालाजी पांचाळ, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सिद्राम कारभारी, सुरेश गवळी व शिवसैनिक व समस्त गावकरी उपस्थित होते.