धार्मिक स्थळे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ती सुशिक्षित माणसाला कळायला पाहीजे – खा. ओमराजे निंबाळकर !
उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी.
सध्या कोरोनाच्या संकटातून हळू हळू व्यवासाय व इतर ठिकाणाच्या सेवा सुरु होत आहेत त्यातच तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार राणा जगजीतसींह पाटिल यांनी धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्यावर सरकारला हे धार्मिक स्थळे उघडण्याला काय अडचण आहे ? असा सवाल उपस्थीत केला होता त्याबाबत खा.ओमराजे निंबाळकर यांना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सुशीक्षित माणसाला कळायला पाहिजे सरकारला काय अडचण आहे ती धार्मिक स्थळामध्ये भाविकांची येण्याची संख्या जास्त असते त्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून मुंख्यमंत्री साहेब यावर विचार करत आहेत. जाणिपूर्व राज्य सरकार हि अडचण करत नाही भाविकांची काळजी घेऊनच निर्णय घेतलेला योग्य राहिल.
युरोप सारख्या देशात डबल लाँकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे .तशी वेळ आपल्या देशात येऊ नये म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे हळू हाळू सर्व निर्णय योग्य प्रकारे घेत आहेत. सुशीक्षित माणसाने असे बोलणे योग्य नाही असे मत व्यक्त केले. पुढे बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की मलाही तुळजापूरच्या पुजारी व इतर व्यवसायीकांबद्दल आस्ता आहे.मी स्वत मुख्यमंत्र्यांना या विषयावर बोललो आहे. लवकरच निर्णय घेतील पण या विषयावर राजकारण करण्यापेक्षा संवेदनशील नजरेने बघावे आसा संदेशही खा.निंबाळकर यांनी बोलताना दिला.