साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित, कृषि महाविद्यालय, आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथे अळिंबी उत्पादन तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित, कृषि महाविद्यालय, आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथे आठव्या सत्रांतर्गत महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अळिंबी लागवड करण्यात आली. अनुभवातून प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अळिंबी लागवड प्रकल्प राबविण्यात आला. अळिंबी ही एक कवकवर्गीय वनस्पती असून त्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे सकस आहार म्हणून ही अळिंबीकडे पाहिले जाते.
महाविद्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात अळिंबीचे उत्पादन व्यवस्थापन करण्याचा मानस प्रकल्प संचालक प्रा. बुरगुटे के. ए. यांनी व्यक्त केला. अळिंबी उत्पादन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषि निगडित उद्योजक बनण्यासाठी हा कार्यक्रम मोलाची कामगिरी बजावनार असल्याचा विश्वास प्रा. बुरगुटे के. ए. यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दंडनाईक बी.पी., प्रकल्प संचालक प्रा. बुरगुटे के.ए. यांच्यासह विद्यार्थी…
प्रकल्प यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दंडनाईक बी. पी., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा. बंडे के. डी., प्रा. साबळे एस. एन., प्रा. जगधने एस. एम., प्रा. गुरव पी. के., प्रा. सुतार एन. एस., तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.