आठवण येते बालपणीच्या
शाळतील प्रेमळ गुरुजीची
मला।
धोती, कुर्ता,चश्मा,सायकल
हाती काठी अजुन आठवते
मला।
असेल पंधरा ऑगस्ट किंव्हा
सवीस जानेवारी,पांढरे
स्वछ कपड़े घालून गावातून
प्रभातफेरी अजुन आठवते
मला।
ठीक ठिकाणी झडावंदन
राष्ट्रगीत व सलामी दिलेली
अजुन आठवते मला।
मित्रासोबत शेतातील ऊस
खाने,रस पीने,चिंचा,बोरे
आंबेअजुन आठवतात
मला।
वेळ अमावसेला पतंग
उड़वित,चालत,चालत
गाठलेले शिवार अजुन
आठवते मला।
दसरा दिवाळीला नवीन
कपड़े घालून गलोगली
फिरलेले,लाडू करंजा
खाललेले अजुन आठवते
मला।
किती प्रेमळ माणसे होती
ती, अनुभवाची,आपुलकीची
शिदोरी देऊन गेली अजुन
आठवते मला।
===================================================================================
कवि
देविदास पांचाळ सर,
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर। जिल्हा उस्मानाबाद।