साईनाथ जगन्नाथ गवळी,
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा,
प्रतिनिधी,
येत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बरमगाव ता. जि. उस्मानाबाद येथील भाजपला खिंडार पडले आहे. येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी दि. 26 रोजी धाराशिव (उस्मानाबाद) येथील संपर्क कार्यालयात, हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 26 डिसेंबर रोजी, बरमगावचे सरपंच अंगद कोळगे, उपसरपंच बळीराम सिरसट, वैजिनाथ कांबळे, संदिप घोडके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी धारशिवचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलासदादा पाटील यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, उपतालुकाप्रमुख राजनारायन कोळगे, विभागप्रमुख धनंजय इंगळे, विभागप्रमुख सौदागर जगताप आदी उपस्थित होते.