26.2 C
Solapur
September 21, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासाठीं हिंदूराष्ट्र सेनेचे तहसीलदारांना निवेदन.

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा दिवटी, (प्रतिनिधी)

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासाठीं हिंदूराष्ट्र सेनेचे तहसीलदारांना निवेदन. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, धाराशिव हे नाव अतिप्राचीन असून जिल्ह्यातील सर्व नागरिक आपल्या बोलीभाषेत वापरतात हेच नाव आपल्या जिल्ह्याचे वैभव आहे, उस्मानाबाद हे नाव पारतंत्र्याची निशाणी असून हा भारतीयांवर गुलामीचा डाग आहे. त्यामुळे धाराशिव नाव करून सरकारने स्वतंत्र भारतात आपण आहोत याची प्रचीती द्यावी असे यात म्हटले आहे.

तसेच क्रूर अत्याचारक औरंग्याचे नाव काढून टाकून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद जिल्ह्यास सन्मानाने देऊन सर्व राजकीय पक्षांनी आपला छत्रपतींच्या विचाराचा वारसा तोंडी न बोलता तो वास्तवात जपून दाखवण्यात यावा असंही या निवेदनात म्हटले आहे.

या पूर्वी देखील संघटनेच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा सरकारने दखल न घेतल्यामुळे पुनःश्च एकदा निवेदन देण्यात आल्याचे यावेळी, हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी म्हणाले, व आता दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी महंत मावजीनाथजी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, संजय सोनवणे, अर्जुन आप्पा साळुंके परिक्षित साळुंके, ओमकार पवार, सुधीर कदम बापुसाहेब नाईकवाडी, शिवाजी बोधले गुलचंद व्याव्हारे, अजय साळुंके, सागर इंगळे, गणेश जळके, जिवनराजे इंगळे गिरीश लोहारेकर, दादा भोसले व अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते.

Related posts