कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर।जिल्हा उस्मानाबद।
———–—––——––———
कसे कळणार ?
भावी पिढीला की ,
सावित्री माता होती,
जिने मुलींसाठी पहिली शाळाकाढली होती
कसे कळणार ?
गांधी, टिळक, नेहरू फुले-आंबेडकर ,शास्त्रीजी, लॅपटॉप आणि मोबाइलच्या काळात ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले होते
कसे कळणार?
आपले पूर्वज ज्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या
आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा, ज्या माणसाला माणसाशी जोडतात
नातेसंबंध शिकवतात, टिकवतात,
कसे कळणार ?
तंत्रज्ञानातील पिढीला
माझा बाप स्वतः
नांगर ओढत होता
बैला सोबत, बैल होत होता ते जीवाचे साथीदार होते आपल्या मुलाबाळां प्रमाणे त्याना
जपत होता —
कसे कळणार ?
तंत्रज्ञानातील भावी पिढीला आपले गुरुजी पाटी, पेन्सिल, पुस्तक ,छडी, सोबत शिकवत होते इतिहास नवा घडवत होते केवळ एक आठवण फक्त आठवण राहील ,तंत्रज्ञानातील व्यस्त भावी पिढीला हे कसे कळणार ?
पण आपण सुजान समजदार
सर्व पालक आपली सर्वांची जबाबदारी ,खबरदारीने
त्यांना जुना इतिहास शिकवाल!
संस्कृति शिकवाल,
शुभमकरोति कल्यानम ,
,पसायदान, वंदे मातरम शिकवाल—सर्व थोरांची
ओळख करुंन देणार
तंत्रज्ञानातील भावी पिढीला हे कसे कळणार ?
हे कसे कळणार?