तुळजापूर

सैन्यात भरती झाल्याने किलजमधील तरुणांचा करण्यात आला सत्कार.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

किलज – तुळजापूर तालुक्यातील किलज येथील फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सैन्य भरतीमध्ये ३ तरुणांनी परिश्रमाची बाजी लावत गावासाठी मोठा आदर्श ठेवला आहे. गावातील एकदाच ३ तरुण हे भारतीय सैन्य दलात तर एक तरुण हा भारतीय वायू दलात भरती झाला आहे. तसेच गावातील युवा पत्रकार तथा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेचे सदस्य.राम जळकोटे यांचाही या तरुणांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.

सैन्यात भरती होऊन भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाल्याने या जवानांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याचबरोबर भारतीय सैन्य दलात तसेच वायू दलात भरती झालेल्या तरुणांच्या वडिलांचा ही सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील अक्षय पांढरे,नागेश राजमाने, भारत सांगावे, अमोल कापसे, दता मुळे ,प्रवीण कुठार सह गावातील तरुण वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होता तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पांढरे यांनी केले तर आभार राम जळकोटे यांनी मानले.

Related posts