तुळजापूर

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी,
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा,
प्रतिनिधी.

किलज-रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२३ डिसेंबर रोजी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने हा वृक्षारोपण कार्यक्रम तुळजापूर तालुक्यातील किलज येथील सिद्धेश्वर विद्यालय येथे पार पडला.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान टीम उस्मानाबाद यांच्या वतीने यापूर्वी विविध सामाजिक कामे पार पाडली आहेत. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रवक्त्या शीतल लाडके यांच्या वाढदिवसानिमित्त हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर सतत वृक्षारोपण बाबतीत सुद्धा हे प्रतिष्ठान सतत अग्रेसर असत.आपण समाजसाठी काही तरी देणं लागतो या हेतूने प्रतिष्ठान काम करत आहे.प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ४० वृक्ष लागवड केली आणि इतर २० झाडे ही विद्यार्थ्यांना घरामध्ये लावण्यासाठी देण्यात आली . तुम्ही लावलेल्या वृक्षचे आम्ही पालनपोषण करू असे विद्यालयाचे मुख्यध्यापक काळे यांनी यावेळी आश्वासन दिले.

या कार्यक्रमासाठी,मुख्याध्यापक. एन. डी.काळे, एस. बी.गायकवाड, डी. के.येळकोटे, आर. आर.चव्हाण, एस. पी.घोगरे, सह आदी विद्यार्थी उपस्थित होते. तर प्रतिष्ठानचे दिनेश लोमटे,विशाल केदार,शिवराज साखरे, संकेत कोनाळे,अविनाश कुंभार, गणेश सांगवे,प्रतीक भोसले,मनोज देवकते, किरण मोजगे,वैभव मुळे,ADV. काणीफ काणतोडे,कुणाल लोमटे,अविष्कार फस्के, गणेश काटे, शुभम नलावडे,प्रसाद राजमाने, राम जळकोटे सह आदी सदस्य उपस्थित होते.

Related posts