सोलापूर शहर

बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व पत्रकार पुरस्कार जाहीर

सोलापूर:
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे जिल्हारतरीय गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी आणि गुणवंत पत्रकार पुरस्कार पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्षे असून शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडाळा, ता.उत्तर सोलापूर येथे वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी सांगितले.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकारिता पुरस्कार -योगेश परशुराम कबाडे बातमीदार,दैनिक दिव्य मराठी सोलापूर,भरतकुमार
मोरे -उपसंपादक -दैनिक पुण्यनगरी, सोलापूर. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार :- प्रा.अभिजित श्रीमंत भंडारे- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय मजरेवाडी,सोलापूर, प्राचार्य शंकर भीमराव खळसोडे,न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडाळा ता.उत्तर सोलापूर, गिरीष विष्णू देवकते-जी.बी.घोडके विद्यालय नान्नज ता.उ.सोलापूर, जहांगीर कासिम तांबोळी,बॅ.बाबासाहेब भोसले प्रशाला कासेगांव ता.द.सोलापूर दत्तात्रय तुकाराम कसबे -माध्यमिक आश्रम प्रशाला लांबोटी, ता.मोहोळ, मनोजकुमार नागनाथ खडके जगदंबा विद्यालय पोखरापूर,ता.मोहोळ , चक्रधर विश्वनाथ पाटील श्री.जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय करमाळा,दत्तात्रय सर्जेराव अवघडे – दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर, ता.माळशिरस,नागनाथ लक्ष्मण गायकवाड- श्रीमंतराव काळे विद्यालय जैनवाडी ,धोंडेवाडी ता. पंढरपूर, विठ्ठल निवृत्ती एकमल्ली – श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर
ता.मंगळवेढा, जि.सोलापूर
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार:- सौ.सुनंदा शामरात बनसोडे – भैरवनाथ प्रशाला केवड ता. माढा,सौ.सविता राजेश वाणी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी (साकत) ता.बार्शी,राजर्षी शाहु महाराज गुणवंत कर्गचारी पुरस्कार-भीमसेन केरु मिसाळ- सौ. हि.ने.न.शाह कन्या प्रशाला बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर बसवेश्वर शामराव हंबीरराव – पांडुरंग विद्यालय कटफळ ता.सांगोला ,सोमनाथ अर्जुन मोटे – मतिमंद निवासी शाळा कुर्डुवाडी, ता.माढा
पुरस्कार वितरण प्रसंगी सत्कार मूर्तीचा सहकुटुंब सत्कार करण्यात येणार असून सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, वृक्षाचे रोप, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पत्रकार परिषदेला राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष-बाळासाहेब डोळसे, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, विजयकुमार लोंढे,प्रा.राजदत्त रासोलगीकर,संग्राम कांबळे, मीना सन्मुख,संजयकुमार शिवशरण, वीरभद्र स्वामी, दाउद आतार, चंद्रमणी वाघमारे ,राजेंद्र सोरटे आदि उपस्थित होते.

Related posts