पंढरपूर

स्वेरीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर)
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी सरदार पटेल यांच्या जीवनाचे महत्व सांगून त्यांच्या कार्यातील विविध पैलू उलगडून दाखवताना पटेल यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली व अखंड भारतासाठी सरदार पटेलांच्या योगदानाचे महत्व देखील सांगितले. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने थोर विचारवंतांना स्वेरीमध्ये आमंत्रित करून त्यांच्या बौद्धिक विचारांची मेजवानी दिली जाते परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे स्वेरीत मोजक्या स्टाफच्या उपस्थितीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. प्रतिज्ञेचे वाचन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी केले. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, प्रा. बी. डी. गायकवाड, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts