24.2 C
Solapur
September 26, 2023
अक्कलकोट

सोशल मीडिया व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत दोन वर्षांच्या मुलीला तिच्या आईची भेट घडवून आली.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
सोशल मीडिया व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत दोन वर्षांच्या मुलीला तिच्या आईची भेट घडवून आईकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, की शहरात बुधवारी तारीख २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अक्कलकोट बसस्थानकावर एक २८ वर्षांचा बेशुद्ध इसम व दोन वर्षांची लहान मुलगी मिळून आली. या मुलीचे वडील दारूच्या नशेमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून होते. त्या व्यक्तीजवळ लहान मुलगी रडत बसली होती. त्या वेळी कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार अनिल चव्हाण यांनी त्या लहान मुलीस पोलिस स्टेशन येथे आणून महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. 

त्यांनतर पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी व सोबत गोपनीय अंमलदार धनराज शिंदे आणि पोलिस अंमलदार मियावाले, पोलिस अंमलदार भंडारी यांना घेऊन एसटी स्टॅंड परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या इसमाचा फोटो काढून वेगवेगळ्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले. त्यामुळे सोशल मीडियाच्याद्वारे लोकांपर्यंत लहान मुलीचा आणि बेशुद्ध इसमाचा फोटो पोचला आणि अवघ्या पाच ते सहा तासांत त्या व्यक्तीची ओळख पटली

Related posts