3 डिसेम्बर(दिव्यांग सहायता दिन)- – – – –
लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
3 डिसेंबर जागतिक विकलांग दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम विकलांग सहाय्यता दिनाच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 3डिसेंबर रोजी शासनाने दिव्यांग सहायता दिन म्हणून घोषित केले आहे. विकलांग म्हणजेच विशेष गरजा असणारे विद्यार्थी. आपण सर्वसामान्यांचे जीवन तर आपण जगतच आहोत, निसर्गाने आपणास सर्वांना सर्व जीवांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले आहेत. पण काहींना आपल्याला मदत साह्यता करावी लागते, ते म्हणजे समाजातील विशेष घटक विशेष गरजा असणारे विद्यार्थी व समाजातील घटक ज्यांना विशेष गरज असते ती मदतीची सहायता करण्याची त्या गरजा ओळखून शासनाने समाजाने आपण सर्वजण त्यांना मदत करणे सहाय्यता करणे हे खूप गरजेचे आहे. दिव्यांग सहायता दिन. आज त्यानिमित्त सर्व बंधू भगिनींना त्यांच्या सुदृढ आरोग्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया.
आज समाजात आपण आनंदाने राजरोसपणे फिरतो, वावरतो, खेळतो, बागडतो, आनंद घेतो पण काही घटक यापासून वंचित राहतात. अशा घटकांकडे शासनाने सर्व समाजाने वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे. शासन स्तरावर तर भरपूर योजना राबविल्या जात आहेत. पण त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आपणास सर्वांच्या हातात आहे व आपले आद्य कर्तव्य आहे. अनुदान ,उपायाने अथवा वस्तू साधनांच्या रुपाने ती विशेष गरजा असलेल्या व्यक्ती पर्यंत पोहोचली पाहिजे व त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, तर आपण त्यात यशस्वी झालो असे समजावे. साधारणपणे अपंगत्वाचे आपल्याला बरेच प्रकार दिसून येतात. पायांनी, डोळ्यांनी, हातांनी ,मतिमंद, गतिमंद, कर्णबधिर, अलीकडे नेहमी मानसिक तणावात राहणारी सुद्धा या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सर्व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने स्वतंत्र शाळा सुरू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून जिल्हा स्तरावर तालुकास्तरावर विविध योजना माननीय जिल्हा समन्वयक माननीय शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत राबविल्या जातात. तालुकास्तरावर गटशिक्षण कार्यालयामार्फत अशा विद्यार्थ्यांची नोंद केली जाते व शाळा निहाय त्यांची गणना करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या सुविधा पुरविल्या जातात.
पालकांनी जागृत राहून आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष माहिती जाणून घेतली पाहिजे. अंधांसाठी ब्रेल लिपीच्या माध्यमातून अपंगांसाठी सायकल, विविध शैक्षणिक उपक्रम ,खेळण्या, पुस्तके, कर्णबधिरांसाठी मशीन अशा स्वरूपात शासनामार्फत तसेच विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत सहायता केली जाते. समाजातील मनाने थोर असणार्या व्यक्ती अशा कार्यात पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करतात. खरोखरच या सर्वांना आजच्या या दिवशी खूप खूप अभिनंदन व आभार व्यक्त करावेसे वाटते. जागतिक विकलांग दिन 1992 पासून संपूर्ण जगात साजरा केला जातो. अपंगांचे हक्क त्यांचा स्वयंरोजगार आर्थिक सहाय्य त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना वेगवेगळे नवनवीन प्रकल्प वेगवेगळ्या सहाय्यक योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करते. आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांना करण्यात येते. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने तसेच पालकांनी जागृत राहून वेळोवेळी शासनाच्या या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. तळागाळातील दींन अशा विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच योजना राबविण्यात येतात. आज आपण पाहतो बऱ्याच कार्यालयात विकलांग व्यक्ती कर्मचारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत व ते चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपले कामकाज करीत आहेत.
फक्त शालेय स्तरावर नाही फक्त शिक्षणासाठी म्हणून नव्हे तर घरी बसल्या बसल्या विकलांग व्यक्ती आपला लघुउद्योग सुरू करू शकतात. छोट्याछोट्या या लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. त्याची संपूर्ण माहिती मिळवणे व त्या कार्यासाठी प्रेरित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्वात कमी उंची असणाऱ्या व्यक्तीची सुद्धा विकलांग म्हणून नोंद घेण्यात आली आहे. आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून थोडीशी माहिती ती आपल्या समोर दिली आहे पुनश्च एकदा सर्व बंधू-भगिनींना विकलांग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
धन्यवाद।। 🙏🏻🙏🏻